Saturday , December 20 2025
Breaking News

Belgaum Varta

येळ्ळूर – वडगाव रस्त्याच्या दुरुस्तीसंदर्भात पालकमंत्र्यांना येळ्ळूर ग्रामपंचायतच्यावतीने निवेदन सादर

    बेळगाव : येळ्ळूर ते वडगावपर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण लवकरात लवकर करून नूतनीकरण करण्यात यावे, अशी मागणी येळ्ळूर ग्रामपंचायतच्यावतीने राज्याचे सार्वजनिक बांधकाम व जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्याकडे करण्यात आली आहे. बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालय येथे येळ्ळूर (ता. जि. बेळगाव) ग्रामपंचायतच्यावतीने उपाध्यक्ष आणि सदस्यांनी उपरोक्त मागणीचे निवेदन जिल्हा पालकमंत्री जारकीहोळी यांना …

Read More »

“बेलगाम कॅन्टोन्मेंट बोर्ड”चे नामकरण “बेळगावी कॅन्टोन्मेंट बोर्ड” करण्याचा घाट

  महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या माध्यमातून मराठी भाषिकांच्या वतीने आक्षेप बेळगाव : बेलगाम कॅन्टोन्मेंट बोर्डचे नामकरण बेळगावी कॅन्टोन्मेंट बोर्ड करण्यासंदर्भात काढण्यात आलेल्या नोटीसनुसार आज महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने नामांतराला कॅन्टोन्मेंट बोर्डचे सीईओ श्री. राजीव कुमार यांच्या नावे पत्र देवून सदर आक्षेप नोंदविण्यात आला. स्वातंत्र्य पूर्व काळापासून “मराठा लाईट इन्फंट्री …

Read More »

रुग्णांच्या आयुष्यातील दुसरा देव म्हणजेच डॉक्टर : रोटरीचे माजी प्रांतपाल अविनाश पोतदार

  संजीवीनी फौंडेशनच्या वतीने डॉक्टर्स दिनी मानसोपचार तज्ज्ञांचा सन्मान बेळगाव : प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजारपणात औषधोपचाराची गरज असते त्यावेळी त्यांना देवरूपी डॉक्टर ती गरज पूर्ण करत असतात, म्हणूनच त्यांना रुग्णांच्या आयुष्यातील दुसरा देव म्हणायला हरकत नाही. अनेकजण वेगवेगळ्या कारणांमुळे मानसिक तणावाखाली वावरताना दिसत आहेत अशा वेळी मानसोपचार तज्ज्ञांसमोर मोठी जबाबदारी …

Read More »

पीओपी गणेश मूर्तींवर बंदी नको; गणेशोत्सव महामंडळाच्यावतीने प्रशासनाला निवेदन

  बेळगाव : दरवर्षाप्रमाणे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आता मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाने मूर्तीकारांसाठी विशेष पुढाकार घेतला आहे. महामंडळ पदाधिकाऱ्यांनी बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री सतीश जारकीहोळी तसेच बेळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी नितेश पाटील आणि बेळगाव जिल्हा पंचायतीचे सीईओ राहुल शिंदे या विविध अधिकाऱ्यांची भेट घेऊन या संदर्भात आपले म्हणणे …

Read More »

निपाणी तालुका म. ए. समितीच्या अध्यक्षपदी अजित पाटील

  कार्याध्यक्षपदी बंडा पाटील ; निपाणीतील राजवाड्यात निवडी निपाणी (वार्ता) : येथील श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर सरकार यांच्या राजवाड्यात श्रीमंत विजयराजे देसाई सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली निपाणी तालुका म. ए. समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी नूतन कार्यकारीणीची निवड करण्यात आली. अध्यक्षस्थानी प्रा. भारत पाटील होते. महाराष्ट्र एकीकरण समिती निपाणी तालुका अध्यक्षपदी अजित …

Read More »

निपाणीतील दोघा मित्रांचा काळम्मावाडी धरणात बुडून मृत्यू

  आंदोलन नगरात शोककळा निपाणी (वार्ता) : येथील आंदोलन नगरातील बारावी मधील वर्गमित्र काळम्मावाडी, (ता. राधानगरी) पर्यटन करून धरण पाहण्यासाठी गेले होते. पण पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी (ता.१) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. गणेश चंद्रकांत कदम (वय १८) आणि प्रतीक पाटील …

Read More »

शेतकऱ्यांची शेतजमीन आधारला जोडणी सुरू

  बेळगाव : अलीकडे भूमाफियांची वक्रदृष्टी गोरगरीब शेतकऱ्यांच्या जमिनीवर पडताच हे भूमाफिया तसेच त्यांचे दलाल शेतकऱ्यांच्या शेतीउताऱ्यात फेरफार करून शेतजमिनी आपल्या नावे करून घेण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. त्यामुळे गोरगरीब शेतकऱ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. शेतकरी आपल्या शेतीव्यवसायत रममाण होतात रोजच्या शेती कामकाजातून वेळ काढून वारंवार आपले शेती …

Read More »

‘हिंदू इकोसिस्टम’ बनवण्यासाठी प्रत्येक राज्यात हिंदू राष्ट्र समन्वय समितीची स्थापना करून हिंदूंवरील अन्यायांच्या विरोधात जनआंदोलन करणार!

  पणजी : दरवर्षी ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’साठी देशविदेशातून येणार्‍या, तसेच ‘हिंदु राष्ट्र’ संकल्पनेशी जोडलेल्या सर्व हिंदू संघटनांनी ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’च्या माध्यमातून वर्षभर कार्यरत राहण्याचा निर्णय घेतला आहे. यातून हिंदु ‘इको-सिस्टीम’ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आज काश्मीर, बंगाल आदी प्रांतांतील हिंदूंवरील अत्याचार देशभरात चालू झाले आहेत. त्यामुळे …

Read More »

भारत विकास परिषदेच्यावतीने घरकुल वृद्धाश्रमात वनमहोत्सव

  बेळगाव : भारत विकास परिषदेच्यावतीने घरकुल वृद्धाश्रम येथे वनमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. बेनकनहळ्ळी येथील आश्रमाच्या निसर्गरम्य परिसरात विविध फळांची रोपे लावण्यात आली. भारत विकास परिषदेचे संस्थापक डॉ. सुरज प्रकाश यांच्या जन्मदिनानिमित्त आश्रमातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना फळे वाटप करण्यात आली. प्रारंभी अक्षता मोरे यांनी संपूर्ण वंदे मातरम् प्रस्तुत केले. …

Read More »

आंतरराष्ट्रीय खो-खो दिन उत्साहात संपन्न

  बेळगाव : साधना क्रीडा संघ बेळगाव यांच्यावतीने पंडित नेहरू पदवीपूर्व महाविद्यालयाच्या मैदानावर आंतरराष्ट्रीय खो-खो दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष श्री. संजय बेळगावकर होते. याप्रसंगी खो-खो कोच श्री. प्रकाश देसाई, श्री. वैजनाथ चौगुले, श्री. चिन्नास्वामी व श्री. शिवानंद कोरे यांनी आंतरराष्ट्रीय खो-खो दिनाबद्दल शुभेच्छा दिल्या व …

Read More »