Monday , September 21 2026
Breaking News

Belgaum Varta

गणेशपूर येथे विद्युत तारेच्या स्पर्शाने म्हैस दगावली

  बेळगाव : ट्रान्सफॉर्मर बसवलेल्या खांबाच्या ठिकाणी विद्युत तारेच्या स्पर्शाने एका म्हशीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दुर्गामाता कॉलनी, गणेशपुर येथे आज रविवारी दुपारी घडली. विजेच्या धक्क्याने मृत्युमुखी पडलेली म्हैस दुर्गामाता कॉलनी येथील बाळू अशोक पाटील यांच्या मालकीची होती. पाटील हे आज नेहमीप्रमाणे दुपारी आपल्या म्हशी चरावयास घेऊन जात होते. त्यावेळी …

Read More »

“वारकरी म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आत्मा” : आमदार शिवाजीराव पाटील

  कुद्रेमानी येथील वारकरी भक्तांना पंढरपूर येथे आषाढी एकादशीच्या शुभेच्छा! पंढरपूर (प्रतिनिधी) : पंढरपूरचा गजर, टाळ-मृदंगाचा नाद, विठ्ठल नामस्मरण, आणि वारकऱ्यांची भक्तिभावाने ओतप्रोत भरलेली दिंडी! याच आषाढी वारीच्या निमित्ताने बेळगाव तालुक्यातील कुद्रेमानी गावातील विठ्ठलभक्त वारकरी मंडळींची पंढरपूरमध्ये चंदगड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार शिवाजीराव पाटील (भाऊ) यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी …

Read More »

बेळगावात लोकायुक्तांनी सर्वेक्षकाला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले!

  बेळगाव : लोकायुक्तांनी एका सर्वेक्षकाला लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. ही घटना बेळगावातील यमकनमर्डी येथे घडली. सर्वेक्षक बसवराज कडलगी यांना लोकायुक्तांनी रंगेहाथ पकडले. त्यांनी ११ई नकाशा तयार करण्यासाठी लाच मागितली होती. प्रकाश मैलकी नावाच्या व्यक्तीने याबद्दल लोकायुक्तांकडे तक्रार केली होती. विश्वसनीय माहितीच्या आधारे, लोकायुक्त अधिकाऱ्यांनी छापा टाकला आणि बसवराज …

Read More »

बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुरायाच्या चरणी साकडे

  पंढरपूर : राज्यावरील पुढची संकटे दूर व्हावीत, बळीराजा सुखी समाधानी व्हावा, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विठुमाऊलीला साकडे घातले. आज आषाढी एकादशीच्या पावन दिवशी पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर उसळला आहे. पंढरीत पहाटे अडीच वाजल्यापासून पूजा, टाळ-मृदंगाचा गजर, विठ्ठलनामाचा जयघोष सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस …

Read More »

भर पावसात बळीराजासोबत राबले कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री!

  पीक उत्पादन वाढीला देणार चालना – पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांची ग्वाही कोल्हापूर (जिमाका): राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज भर पावसात डोक्यावरील येरलं बाजूला करत शेतात पावर टिलरद्वारे चिखलगुट्टा (मशागत) करुन वाफ्यामध्ये भात रोपांची लागण केली.. शेतकऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बांधावर बसून झुणका …

Read More »

अनमोड घाटातील रस्ता खचला; 2 सप्टेंबरपर्यंत वाहतूक बंदी

  दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांचा तातडीचा आदेश खानापूर : बेळगाव-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अनमोड घाटातील रस्ता पूर्णपणे खचल्याने वाहतूक धोकादायक बनली आहे. मागील दोन दिवसांपासून जमिनीत भेगा पडत होत्या. अखेर शनिवारी पहाटे चारच्या सुमारास संपूर्ण रस्ता दरडीसह खाली कोसळला. या घटनेनंतर दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाने तातडीने आदेश काढून 2 सप्टेंबर 2025 पर्यंत …

Read More »

बेळगावसह १० महानगरपालिकांनी दिली बंदची हाक; संपाचा निर्णय

  बेंगळुरू : राज्यातील १० महानगरपालिकांनी विविध मागण्या पूर्ण करण्याच्या मागणीसाठी बंदची हाक दिली आहे आणि संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील १० महानगरपालिका ८ जुलै रोजी पूर्ण दिवस बंद पाळतील आणि महानगरपालिकांचे कर्मचारी सामूहिक रजा घेऊन निषेध करतील. बेळगाव महानगरपालिका आणि बीबीएमपीसह राज्यातील १० महानगरपालिकांचे कर्मचारी विविध मागण्या पूर्ण …

Read More »

गोकाक यात्रेत बंदोबस्तातील एएसआयचे हृदयविकाराने निधन

  बेळगाव : गोकाक येथील यात्रेच्या बंदोबस्तासाठी नियुक्त असलेले सहायक उपनिरीक्षक लालसाब मिरानायक यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. आज सकाळी ६.३० च्या सुमारास गोकाक शहरातील एस.सी./एस.टी. वसतिगृहात वास्तव्यास असलेले हुबळी एपीएमसी पोलिस ठाण्याचे सहायक उपनिरीक्षक ललासाब जीवनसाब मिरानायक (वय ५६) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने अकाली निधन झाले. मृत लालसाब यांनी …

Read More »

ठाकरे ब्रँड एकत्र; महाराष्ट्राच्या राजकारणात नवी नांदी!

  मुंबई : हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्र लागू करण्याचे दोन शासकीय आदेश रद्द करण्याच्या महायुती सरकारच्या निर्णयावर जल्लोष करण्यासाठी शिवसेना (ठाकरे) आणि मनसेच्या वतीने आज विजयी सभेचे आयोजन करण्यात आले. सुमारे दोन दशकानंतर ठाकरे बंधू एकाच मंचावर एकत्र दिसल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवे पर्व सुरु झाले आहे. हिंदी सक्तीच्या निर्णयाला …

Read More »

विवेकानंद मल्टीपर्पज सौहार्द सोसायटीतर्फे सुहास गुर्जर यांचा सत्कार

  बेळगाव : सुहास गुर्जर यांनी रिलाएबल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून उद्योग क्षेत्रात उत्तुंग यश मिळवून बेळगांवचे नाव परदेशात उज्वल केले. पण याबाबतचा गर्व त्यांनी कधी केला नाही. हा त्यांचा गुण वाखाणण्यासारखा आहे, असे उद् गार कॉलेज रोड येथील सुप्रसिध्द विवेकानंद मल्टीपर्पज सौहार्द को-ऑप. सोसायटीचे व्हाईस चेअरमन प्रा. दत्ता नाडगौडा यांनी काढले. …

Read More »