नवी दिल्ली : गेल्या काही दिवसापासून मान्सून कधीपासून सुरू होईल याची वाट राज्यातील शेतकरी करत होते. गेल्या वर्षी मान्सून उशीरा सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांची मोठे नुकसान झाले होते. यामुळे यावर्षीही पाऊस वेळेत सुरू होईल की नाही यावरुन शेतकरी चिंतेत होते. देशातील तापमानातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. काल दिल्लीत तापमानाने …
Read More »अर्जुन जाधव यांच्या “प्रेयसी एक आठवण..” साहित्यकृतीला राज्यस्तरीय पुरस्कार
बेळगाव : बेळगावचे साहित्यिक अर्जुन विष्णू जाधव लिखित “प्रेयसी एक आठवण ..” या गाजत असलेल्या सत्य प्रेम स्वरूप कादंबरीला पलपब पब्लिकेशन संस्था, अहमदाबाद (गुजरात) या संस्थेचा “पलपब राज्यस्तरीय साहित्य भूषण पुरस्कार 2024” हा उत्कृष्ट वाड्:मय निर्मितीसाठीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. पलपब पब्लिकेशन संस्था अहमदाबाद (गुजरात) ही संस्था गुजरात …
Read More »कावळेवाडी महात्मा गांधी संस्थेतर्फे कवी संमेलनाचे आयोजन
बेळगाव : कावळेवाडी येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्थेतर्फे एक जून रोजी सकाळी दहा वाजता बिजगर्णी हायस्कूलमध्ये कवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. संमेलन उद्घाटन एस. एम. जाधव यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्ष म्हणून ऍड नामदेव मोरे उपस्थित राहणार आहेत. फोटो पूजन आर. बी. देसाई यांच्या हस्ते तर दीपप्रज्वलन …
Read More »शैक्षणिक वर्षात राज्यात ५०० पब्लिक स्कूल : मंत्री मधु बंगारप्पा
बंगळूर : आम्ही शैक्षणिक वर्षात कर्नाटकात ५०० पब्लिक स्कूल सुरू करणार आहोत, असे सांगून शालेय शिक्षण मंत्री मधु बंगारप्पा यांनी, पुढील ३ वर्षांत ३ हजार कर्नाटक पब्लिक स्कूल सुरू करण्याचे उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट केले. म्हैसूर येथील काँग्रेस भवनात पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, “आम्ही सीएसआर अनुदानांतर्गत पब्लिक स्कूल सुरू करणार …
Read More »प्रज्वलचा अटकपूर्व जामीन विशेष न्यायालयाने फेटाळला
विमानतळावरच अटकेची शक्यता; ३१ रोजी होणार आगमन बंगळूर : सेक्स स्कँडलमध्ये गुंतलेले हसनचे खासदार प्रज्वल रेवण्णा यांचा न्यायालयाने बुधवारी अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे प्रज्वलला आता विमानतळावरच अटक होण्याची शक्यता आहे. त्याने वकीलामार्फत आजच लोकप्रतिनीधी विशेष न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. बंगळुर येथील विशेष न्यायालयाने बुधवारी हसनचे खासदार …
Read More »चन्नेवाडी शाळेला गटशिक्षणाधिकारी राजश्री कुडची यांची भेट
खानापूर : चन्नेवाडी येथील बऱ्याच वर्षांपासून बंद असलेली शाळा गावकरी व पालक वर्गाच्या प्रयत्नाने पुन्हा सुरू होण्याच्या मार्गावर आहे. बंद असलेल्या शाळेला सुरू करण्यासंदर्भात खानापूर तालुका गटशिक्षणाधिकारी श्रीमती राजश्री कुडची यांना काही दिवसांपूर्वी गावकऱ्यांच्या तर्फे निवेदन देण्यात आले होते, यासाठी मंगळवार दिनांक २८ मे रोजी श्रीमती कुडची यांनी सीआरपी …
Read More »दत्त खुले नाट्यगृहाजवळील पाणी वापरात आणा
निपाणी (वार्ता) : शहरात पाणी टंचाईच्या पार्श्वभुमीवर कोडणी-गायकवाडी येथील खणीतील पाणी उपसा करून तलावामध्ये सोडण्याची मागणी होत आहे. याशिवाय शहरात असणाऱ्या दत्त खुले नाट्यगृहाजवळील तलावातील पाणी वापरात आणावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते पंकज गाडीवड्डर यांनी केली आहे. पंकज गाडीवड्डर म्हणाले, इ.स. गेल्या चाळीस वर्षापासून येथील वड्डर समाज गायकवाडी येथील …
Read More »खानापूर येथील जवानाचे निधन
खानापूर : खानापूर तालुक्यातील कक्केरी येथील सैनिक मंजुनाथ अंबडगट्टी (वय ३५) यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. गेल्या 16 वर्षांपासून मंजुनाथ हे भारतीय लष्कराच्या इंजिनिअर रेजिमेंटमध्ये कार्यरत होते. गेल्या शुक्रवारी एका अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना दिल्लीतील मिलिटरी बीएस रुग्णालयात दाखल करण्यात आले …
Read More »हुतात्मा दिनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे; खानापूर तालुका समितीच्यावतीने आवाहन
खानापूर : 1986 मध्ये झालेल्या कन्नडसक्ती आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी शनिवारी (ता.१) रोजी सकाळी साडेआठ वाजता हिंडलगा येथील हुतात्मा स्मारक येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने करण्यात आले आहे. भाषावार प्रांतरचना करण्यात आल्यापासून सीमाप्रश्नाची सोडवणूक व्हावी यासाठी मराठी भाषिक सातत्याने प्रयत्नशील आहेत. तरीही …
Read More »हलगा-मच्छे बायपास विरोधातील स्थगिती उठवताच जेसीबी दाखल
बेळगाव : हलगा- मच्छे बायपास प्रकरणी शेतकऱ्यांनी सुमारे दीड दशके चालविलेल्या लढ्याची धार शेतकऱ्यांतील फुटीमुळे कमी होताना दिसत आहे. या प्रकरणी काही शेतकऱ्यांनी नुकसानभरपाईचा मोबदला घेतला आहे तसेच बायपास रस्त्याचे अर्ध्याहून अधिक काम पूर्ण झाले आहे. नुकताच हलगा-मच्छे बायपास जमीन संपादन विरोधात शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या याचिकेवरील स्थगिती उठवताच ठेकेदाराने …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta