बेळगाव : बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची १७ जानेवारी रोजी होणाऱ्या हुतात्मा अभिवादन संदर्भात विचार विनिमय करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली आहे. शनिवार दिनांक १३ रोजी दुपारी ठीक २.०० वाजता मराठा मंदिर रेल्वे ओव्हर ब्रिज येथे ही बैठक होणार आहे. तरी या बैठकीला बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी, …
Read More »उद्धव ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी कोल्हापूर सीमेवरील कन्नड बोर्ड जाळले
कोल्हापूर : बेळगावात कन्नड नामफलकांच्या सक्तीचे महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. बेळगाव महाराष्ट्राच्या हक्काचे, ते भविष्यात महाराष्ट्रातच येणार असे सांगत शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी आज कोल्हापूर सीमेवरील कन्नड बोर्ड उखडून जाळून टाकले. कर्नाटक सरकारने बेळगावसह सीमाभागात दुकाने, आस्थापनांना कन्नड भाषेतील नामफलक अनिवार्य केले आहेत. मात्र सरकारने कारवाई …
Read More »बेळगाव महापालिकेकडून कन्नड पाट्यांसाठी मोहीम
बेळगाव : राज्य सरकारच्या कन्नड नामफलक अनिवार्य केल्याच्या आदेशानंतर बेळगाव महानगरपालिकेने कन्नड नामफलक न लावलेल्या दुकानदारांना नोटीस पाठविण्यास सुरवात केली आहे.बेळगाव महापालिकेच्या अखत्यारीतील दुकाने, व्यापारी आस्थापने, संकुलांची दररोज तपासणी करत संबंधित दुकानांच्या नामफलकांवर 60 टक्के जागा चिन्हांकित करण्यात येत आहे. नामफलकांवर 60 टक्के कन्नड मजकूर असणे अनिवार्य असल्याच्या नोटिसा …
Read More »हायड्रोलिक वायरचा धक्का बसून एकाचा मृत्यू
निपाणी (वार्ता) : सहापदरी रस्ता कामासाठी आलेल्या वेस्ट बंगाल येथील कर्मचाऱ्यांचा निपाणी येथे मृत्यू झाला. राजेश दपाऊराव (वय २८) असे मयत झालेल्या कामगाराचे नाव आहे. राजेश हा तीन वर्षापासून सहापदरी रस्ते कामासाठी लागणाऱ्या सिमेंट बॅरिकेट्स तयार करणाऱ्या एका इंन्फ्रा कंपनीमध्ये कामावर होता. त्यांचे काम शहराबाहेरील ३० नंबर बिडी कारखान्याच्या …
Read More »कर्नाटक सरकार अयोध्येत उभारणार यात्री निवास
बेंगळुरू : अयोध्येत भव्य राम मंदिर उभारण्यात येत आहे. येत्या 22 जानेवारी रोजी त्या मंदिराचे उद्घाटन होणार आहे, त्यामुळे सर्वत्र राममय वातावरण आहे. देशभरातील अनेक भाविक 22 जानेवारी आणि इतर दिवशी दर्शनासाठी अयोध्येत जाणार आहेत. याच भाविकांचा विचार करून कर्नाटकातील काँग्रेस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. कर्नाटकातून जाणाऱ्या भाविकांसाठी …
Read More »‘प्रगतिशील’चे साहित्य संमेलन २८ रोजी
ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे अध्यक्ष : चार सत्रांत आयोजन बेळगाव : प्रगतिशील लेखक संघाचे तिसरे मराठी साहित्य संमेलन रविवारी (दि. 28) आयोजित करण्यात आलेे असून संमेलनाच्या अध्यक्षस्थानी मुंबई येथील ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे असतील. चार सत्रांत संमेलन होणार असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष आनंद मेणसे, उपाध्यक्ष अनिल आजगावकर व मधू …
Read More »न्यायालयातून फरार झालेल्या आरोपीला पकडण्यात बागेवाडी पोलिसांना यश
बेळगाव : बेळगावातील अनेक पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा नोंद असलेला आरोपी अब्दुलगनी शब्बीर शेख हा आज जेएमएफसी न्यायालयाच्या आवारातून पोलिसांना हुलकावणी देऊन पळून गेला होता. मात्र अवघ्या चार तासात सदर आरोपीच्या पुन्हा मुसक्या आवळण्यात बागेवाडी पोलिसांना यश आले आहे. याबाबतची समजलेली माहिती अशी की, टिळकवाडी पोलिसांनी अब्दुलगनी शब्बीर शेख …
Read More »महाराष्ट्र आरोग्य योजनेअंतर्गत उपचार करणाऱ्या इस्पितळांना कारणे दाखवा नोटीस
बेळगाव : महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य विमा योजना आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधींअंतर्गत मराठी भाषिकांना महाराष्ट्र शासनाकडून वैद्यकीय सोयी सुविधा देण्यात आली आहे. आधीच मराठीची कावीळ असलेल्या काही कन्नड संघटनांना पोटशुळ उठली असून महाराष्ट्र सरकारची ही योजना बंद करण्याची मागणी काही कन्नड संघटनानी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी देखील कर्नाटक …
Read More »सलग दोन दिवस रंगणार मॅटवरील कुस्तीचा बेळगाव केसरी आखाडा
बेळगाव : मध्यवर्ती कुस्तीगीर संघटना यांच्या वतीने प्रतिवर्षी जंगी कुस्त्यांचे मैदान आयोजित केले जात असते. यावर्षी शनिवार दिनांक 13 व रविवार दिनांक 14 जानेवारी रोजी प्रथमच गुणांवर आधारित मॅटवरील भव्य कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. बेळगावच्या प्रसिद्ध आनंदवाडी आखाड्यात आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय बेळगाव केसरी मॅटवरील सदर स्पर्धा …
Read More »ईस्लाह ऊर्दू स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन
निपाणी (वार्ता) : येथील ईस्लाह ऊर्दू कॉन्व्हेंट स्कूल येथे विद्यार्थ्यांचे वार्षिक स्नेहसंमेलन पार पडले. इस्लामपूर येथील सामाजिक कार्यकर्ते व सबा फौंडेशनचे अध्यक्ष आबिद मोमीन यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष बशीरअहमद नदाफ होते. मुबारक सौदागर यांनी स्वागत केले. मान्यवरांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांनी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta