खानापूर : कारवार लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांच्या प्रचाराला वेग आला असून आज खानापूर तालुक्यातील पूर्व भागाच्या दौऱ्यावर होत्या. अंजलीताई निंबाळकर यांना खानापूर तालुक्यासह संपूर्ण कारवार लोकसभा मतदारसंघात वाढता प्रतिसाद मिळत आहे.
आज सकाळी अंजलीताई निंबाळकर यांनी देवलत्ती येथील काँग्रेसचे शंकरगौडा पाटील यांच्या घरी काँग्रेस कार्यकर्ते आणि गावकऱ्यांची भेट घेऊन मतयाचना केली आणि स्थानिक उमेदवारास मतदान करून मला लोकसभेत पाठवा आणि मला जनतेची सेवा करण्याची संधी मिळवून द्या, असे यावेळी डॉ. अंजलीताई निंबाळकर म्हणाल्या. त्यानंतर पारीश्वाड येथे वाली कॉम्प्लेक्स येथे अंजलीताई निंबाळकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि निवडणुकीसंदर्भात चर्चा करून मार्गदर्शन केले आणि पारीश्वाड येथील मल्लिकार्जुन मंदिरात जाऊन देवदर्शन घेतले.
हिरेहट्टीहोळी येथे त्यांनी सर्वपक्षीय पंचायत सदस्यांची तसेच काँग्रेस कार्यकर्त्यांची भेट घेऊन चर्चा करून गाडीकोप मार्गे हिरेमुन्नवळी येथील मोहन संबरगी यांच्यासह गावकऱ्यांशी चर्चा करून चिक्कमुन्नवळ, इटगी गावात जाऊन प्रचार केला.
यावेळी त्यांच्यासोबत आर. डी. हंजी, राजू कबूर, अशोक अंगडी, महांतेश राऊत, महादेव कोळी, मकबूल सनदी, संघमेश वाली, संतोष हांजी, प्रसाद पाटील, प्रमोद सुतार, देमान्ना बसरीकट्टी, मंजूनाथ आळवणी, अकलाख सनदी, महांतेश संबरगी, श्रीधर लावगी, संतोष देशनूर, कल्लाप्पा तोरोजी, विवेक तडकोड, साईश सुतार, नागेंद्र तोरोजी, विशाल देसाई, लियाकत बिच्चूनवरजी, कित्तूर मतक्षेत्रातील हबीब शिलेदार साहेब, रायाप्पा, रत्नाकर इटगी तसेच पूर्व भागातील त्या त्या गावातील कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.