Friday , December 19 2025
Breaking News

Belgaum Varta

न्यायालय आवारातून आरोपी फरार!

  बेळगाव : हिंडलगा कारागृहातून न्यायालयात सुनावणीसाठी आणलेल्या आरोपीने पोलिसांना ठेंगा दाखवत फरार झाल्याची खळबळजनक घटना आज बेळगावात घडली. त्यामुळे पोलीस दलात खळबळ माजली आहे. बेळगावातील अनेक पोलीस ठाण्यांना चोरीच्या गुन्ह्यात हवा असलेला आरोपी अब्दुल गनी शब्बीर शेख हा बेळगाव जेएमएफसी न्यायालय आवारातून पळून गेला. पोलिसांच्या उपस्थितीत बेळगाव येथील जेएमएफसी …

Read More »

बेळगावात राष्ट्रीय महामार्गापासून चन्नम्मा सर्कलपर्यंत उड्डाणपूल

  बेळगाव : बेळगाव शहरातील वाढती वाहतूक पाहता आगामी काळात वाहतूक कोंडी टाळून वाहतूक सुरळीत करता यावी यासाठी राष्ट्रीय महामार्गापासून ते चन्नम्मा चौकापर्यंत उड्डाणपूल बांधण्याचे नियोजन असल्याचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी आज पत्रकारांशी संवाद साधून नियोजित उड्डाणपुलाची माहिती दिली. ते म्हणाले की, गांधीनगरजवळ राष्ट्रीय महामार्ग …

Read More »

आमदार आसिफ उर्फ राजू सेठ यांचा निपाणीत उद्या सत्कार

  निपाणी (वार्ता) : बेळगाव उत्तरचे आमदार आणि अंजुमन मुस्लिम बोर्डिंग कमिटीचे अध्यक्ष आमदार आसिफ उर्फ राजू सेठ यांचा येथील निपाणी मुस्लिम समाजाच्या वतीने शुक्रवारी (ता. १२) सायंकाळी ७ वाजता भिमनगर येथील अंजुमन हॉल येथे सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार राजू सेठ यांनी सर्व समाजाचा कैवार घेत मानवधर्म …

Read More »

महाराष्ट्र मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या लाभाला कर्नाटकी पोलिसांचा ससेमिरा!

  बेळगाव : महिनाभरापूर्वी महाराष्ट्र सरकारने आपल्या अध्यादेशात काही बदल व शिथिलता आणून जी आरोग्य योजना महाराष्ट्रात रुग्णांना लागू होती, ती आरोग्य योजना सीमाभागातील ८६५ खेड्यातील जनतेलाही लागू करण्यात आली. खासदार मान. धैर्यशील माने व मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे कक्ष प्रमुख श्री. मंगेश चिवटे यांनी बेळगावात पत्रकार परिषद घेऊन याची संपूर्ण …

Read More »

स्वामी समर्थ पादुका परिक्रमात हजारो भाविकांचा सहभाग

  निपाणी (वार्ता) : श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी अक्कलकोटला जाता येत नाही. अशा स्वामी भक्तांना श्री स्वामींचे दर्शन सहज उपलब्ध व्हावे, या उद्देशाने ‘निपाणी भाग श्री स्वामी समर्थ सेवा समितीने’ परिक्रमेचे आयोजन केले होते. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या ‘पादुका परिक्रमा’ मंगळवारी (ता. ९ ) सायंकाळी निपाणी शहरांमधील व्यंकटेश मंदिर, …

Read More »

ठाकरेंना घराणेशाही म्हणता, मग श्रीकांत शिंदे तुमचा मुलगा नाही हे सिद्ध करा : संजय राऊत

  मुंबई : निकालाने घराणेशाही मोडीत निघाली असा हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला. मुख्यमंत्र्याच्या या वक्तव्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पलटवार केला आहे. घराणेशाहीचा अंत म्हणतात तर मग श्रीकांत शिंदे त्यांचा मुलगा नाही हे सिद्ध करा, असे संजय राऊत म्हणाले. बाळासाहेब ठाकरे आणि यशवंतराव चव्हाणांची घराणेशाही …

Read More »

तिन्ही प्रमुख पक्षांचा बैठकीचा सपाटा

  उमेदवार निवडीवर चर्चा; अधिकाधिक जागा जिंकण्यासाठी रणनीती बंगळूर : काँग्रेस, भाजप आणि धजद पक्ष लोकसभा निवडणुकीसाठी सर्व प्रकारची तयारी करत असून राज्यात राजकीय हालचाली जोरात सुरू आहेत. पुढील लोकसभेत अधिकाधिक जागा जिंकण्याचा निर्धार असलेल्या काँग्रेस, भाजप-धजद युतीची निवडणुकीची सर्व प्रकारे तयारी सुरू आहे. शहराच्या बाहेरील एका खासगी हॉटेलमध्ये भाजपने …

Read More »

हमी योजनांच्या अंमलबजावणीसाठी समिती अध्यक्षाना मिळणार कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा

  बंगळूर : पाच हमी योजना जाहीर करून राज्यात सत्तेवर आलेले काँग्रेस सरकार हमी योजनांवर अधिक भर देत आहे. आता मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बुधवारी हमी योजनांच्या पुरेशा अंमलबजावणीसाठी समिती स्थापन करणार असल्याची घोषणा केली आहे. केपीसीसी कार्यालयात आज झालेल्या काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी आणि जिल्हा प्रभारी मंत्र्यांच्या बैठकीत मुख्यमंत्री सिद्धरामय्या …

Read More »

सौंदत्ती लुटप्रकरणी पाच जणांना अटक, 8.68 हजार किमतीचा मुद्देमाल जप्त

  बेळगाव : सौंदत्ती तालुक्यात वाटमारी करून एका व्यक्तीकडून 8.68 हजार किमतीचे सोन्याचे दागिने आणि मोटरसायकल चोरणाऱ्या अल्पवयीन गुन्हेगारासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी ही माहिती दिली. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलताना एसपी डॉ. भीमाशंकर गुळेद म्हणाले की, 24 ऑगस्ट …

Read More »

प्रा. सोनिया चिट्टी यांच्या “न्यू एक्सलंट पॉईंट्स” पुस्तिकेचे जी.एस.एस. कॉलेजमध्ये प्रकाशन

  बेळगाव : जी एस एस पदवी पूर्व महाविद्यालयाच्या संगणक विभाग प्रमुख प्रा. सोनिया चिट्टी (गोरल) यांनी पदवी पूर्व द्वितीय वर्षाच्या (बारावी) संगणक विज्ञान अभ्यासक्रमावर आधारित “न्यू एक्सलंट पॉईंट्स” ही मार्गदर्शक पुस्तिका, संगणक अभ्यासक्रमाबाबत सखोल माहिती असलेली ही पुस्तिका बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी उपयोगी ठरणारी आहे. बारावीच्या विद्यार्थ्याना संगणक विज्ञान अभ्यासक्रम अवघड …

Read More »