Monday , September 21 2026
Breaking News

Belgaum Varta

करंबळ परिसरात दहशत माजविणाऱ्या टस्करला वनविभागाकडून जेरबंद

  खानापूर : खानापूर तालुक्यातील करंबळ गावात गेल्या अनेक दिवसांपासून दहशत माजवणाऱ्या “त्या” टस्कराला अखेर वनविभागाने जेरबंद केले. खानापूर तालुक्याच्या वनपरिक्षेत्रात वाढलेला वन्य प्राण्यांचा उपद्रव रोखण्यासाठी शिमोगा येथील तज्ञ हत्तींचे पथक खानापुरात दाखल झाले असता लागलीच वनविभागाने मोहीम हाती घेतली आणि हत्तीला पकडण्यात यश मिळवले. खानापूर तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून …

Read More »

हुळंद प्रकरणातील तीन अधिकारी निलंबित

  खानापूर : खानापूर तालुक्यातील हुळंद गावातील 508 एकर जमिनीच्या प्रकरणात गंभीर भ्रष्टाचाराचे प्रकार उघडकीस आल्याने तीन प्रमुख अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. किरणकुमार (एडीएलआर इनचार्ज), पत्थार (सर्वेयर सुपरवायझर इनचार्ज), आणि मुतगी (सर्वेयर) या अधिकाऱ्यांना त्यांनी चुकीचे कागद केल्याच्या आरोपाखाली निलंबनाला सामोरे जावे लागले आहे. हुळंद गावातील सर्वेक्षण क्रमांक …

Read More »

पॉवर ट्रेलरमध्ये सापडून शेतकऱ्याचा मृत्यू

  खानापूर : आपल्या शेतात पावर ट्रेलरद्वारे काम करत असताना पॉवर ट्रेलर खाली सापडून शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी झाल्याची घटना आज गुरुवार दिनांक 9 जानेवारी 2025 रोजी, सायंकाळी पाचच्या खानापूर तालुक्यातील चापगाव नजीक घडली. सदर दुर्दैवी शेतकऱ्याचे नाव अशोक पुंडलिक पाटील (वय 60 वर्ष) आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली सविस्तर माहिती …

Read More »

सदलगा विभाग पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी मकरंद द्रविड, उपाध्यक्षपदी वैभव खोत यांची निवड

    चिक्कोडी : सदलगा विभाग पत्रकार संघाच्या वतीने सोमवार तारीख ६ जानेवारी रोजी शमनेवाडी येथील अमृत गार्डन येथे पत्रकार दिन कार्यक्रम साजरा करण्यात आला. या प्रसंगी मावळत्या अध्यक्षा लीना संकपाळ यांच्या अध्यक्षतेखाली व ज्येष्ठ पत्रकार मार्गदर्शक सुभाष बदनीकाई, संतोष कामात, राजू कोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत २०२५-२६ या वर्षासाठी अध्यक्ष, …

Read More »

“जय महाराष्ट्र”च्या घोषणा देणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी करवेची निदर्शने

  बेळगाव : अनगोळ येथील धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी “जय महाराष्ट्र”ची घोषणा देणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी तसेच बेळगाव महानगरपालिका बरखास्त करावी या मागणीसाठी कर्नाटक रक्षण वेदिकेच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. गुरुवारी शहरातील चन्नम्मा सर्कलमधून करवे कार्यकर्ते एकत्र आले आणि त्यांनी बेळगाव महापालिकेवर मोर्चा काढून महापालिका बरखास्त …

Read More »

निम्हन्समध्ये कर्नाटक प्रशासकीय सेवा अधिकाऱ्यांच्या भरतीसाठी कार्यवाही करा : मुख्यमंत्र्यांची सूचना

  बेंगळुरू : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री शरणप्रकाश पाटील यांना राजीव गांधी वैद्यकीय विद्यापीठात जमा झालेला अतिरिक्त निधी सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांच्या पायाभूत सुविधांसाठी उपलब्ध करून द्यावा आणि निम्हन्समध्ये कर्नाटक प्रशासकीय सेवेतील अधिकारी भरतीसाठी पावले उचलण्याची सूचना केली. बेंगळुरू येथील मुख्यमंत्र्यांचे गृहकार्यालय कृष्णा येथे झालेल्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या प्रगती …

Read More »

राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत सद्गुरु तायक्वांदो अकॅडमीचे यश

    निपाणी (वार्ता) : हुसदुर्ग येथे खुल्या राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेमध्ये फाईट, पुमसे व स्पीड पंच असे तीन विभाग होते. त्यामध्ये निपाणी येथील सद्गुरु तायक्वांदो अकॅडमीचे विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यांनी विविध प्रकारात यश मिळवले. स्पर्धेत विश्वजीत पटनशेट्टी, तिलक कोठडीया, समर्थ निर्मले, अर्णव बोरगावे, …

Read More »

युवा मेळाव्याला पिरनवाडी भागातून बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित राहणार : नारायण मुचंडीकर

  बेळगाव : राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती दिनी म्हणजेच 12 जानेवारी हा युवा दिन म्हणून साजरा केला जातो, याचे औचित्य साधून दरवर्षी प्रमाणे बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती व तालुका युवा आघाडी यांनी रविवार दिनांक 12 जानेवारी रोजी “युवा मेळावा” आयोजित केला आहे. हा मेळावा १२ जानेवारी …

Read More »

तिरुपती मंदिरात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी

  तिरुपती : प्रसिद्ध तिरुपती मंदिराच्या विष्णू निवासाजवळ चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली आहे. या चेंगराचेंगरीत ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर काही जण जखमी झाले आहेत. या चेंगराचंगरीच्या घटनेनंतर जखमींना तातडीने रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. तिरुपती मंदिराच्या रामानायुडू शाळेजवळ झालेल्या चेंगराचेंगरीत मल्लिगा (५०) यांच्यासहित एकूण ६ जणांचा मृत्यू झाला …

Read More »

निर्मितीकडून डॉ. शरद बाविस्कर यांचा प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम संपन्न

  उचगाव : निर्मिती ग्रामीण अभिवृद्धी समाजसेवा संस्था कुद्रेमानी यांच्या वतीने उचगाव विभागातील माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी साहित्यिक डॉ. शरद बाविस्कर यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. उचगाव येथील स्वामी विवेकानंद हायस्कूल येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ही लक्षवेधी मुलाखत संस्थेच्या संस्थापिका आणि अध्यक्षा डॉ. सरिता मोटराचे गुरव यांनी घेतली. …

Read More »