बेळगाव : नैऋत्य रेल्वेच्या अखत्यारीतील एक महत्वकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखले जाणारे बोगी हॉटेल शनिवार दि. ३० पासून बेळगावकरांच्या सेवेत दाखल होत आहे. नैऋत्य रेल्वेचे चौथे आणि बेळगावातील पहिले चोवीस तास हॉटेल ठरणार आहे. मॅग्नम फूड्स कंपनीच्या माध्यमातून या हॉटेलचा कार्यारंभ होणार आहे. शनिवारी सायंकाळी सहा वाजता भव्य उदघाटन कार्यक्रम …
Read More »नियोजित वराच्या खून प्रकरणी 7 जण निर्दोष
बेळगाव : नियोजित वधू व तिच्या प्रियकराने वराचा खून केल्याचा आरोप करत सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या सर्वांची तिसरे अतिरिक्त जिल्हासत्र न्यायालयाचे न्यायाधीश चन्नाप्पा गौडा यांनी निर्दोष मुक्तता केली आहे. हणमंत रामाप्पा मरलिंगप्पण्णावर (वय २८), बसव्वा ऊर्फ बसम्मा परमेश्वर तळवार (वय २५), उमेश सन्नगदीगेप्पा बारिगीडद (वय …
Read More »राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाला वेग; विधानसभा अध्यक्षांसमोर जानेवारी महिन्यात होणार सुनावणी
मुंबई : शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी आमदार अपात्रतेबाबत सुनावणी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सुरु होण्याची शक्यता आहे. आज राष्ट्रवादी आमदार अपात्र सुनावणीची तारीख निश्चित होणार आहे. विधानसभा अध्यक्ष एकीकडे शिवसेना आमदार पात्र आणि अपात्र बाबत निकाल तयार करणार आहे. तर लगेच दुसरीकडे राष्ट्रवादी आमदार अपात्राबाबत सुनावणी सुरु करणार आहेत. विधानसभा अध्यक्षांना …
Read More »“पोलिसांनी वाहनं अडवण्याचा प्रयत्न केला, तर गृहमंत्र्यांच्या…”, मनोज जरांगे-पाटलांचा इशारा
मुंबई : मराठा आरक्षणासाठी मुंबईत करण्यात येणाऱ्या आंदोलनाचा मार्ग आंदोलनकर्ते मनोज जरांगे-पाटील यांनी गुरूवारी (२८ डिसेंबर) जाहीर केला. २० जानेवारी रोजी अंतरवाली सराटी येथून निघणारी पदयात्रा सहा जिल्ह्यांतून जाणार असून, यामध्ये हजारो मराठा बांधव सहभागी होणार आहेत. अशातच मनोज जरांगे-पाटील यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला …
Read More »“तरुणांच्या हाती काम नाही त्यामुळे त्यांचे दिवसातले सात ते आठ तास फेसबुक-इंस्टाग्रामवर…”, राहुल गांधींची टीका
नवी दिल्ली : भारतातल्या युवकांची युवाशक्ती वाया घालवली जाते आहे. भारतात गेल्या ४० वर्षात आली नव्हती इतकी मोठी बेरोजगारी मागच्या दहा वर्षांमध्ये आली आहे. भारतातले तरुण दिवसातले सात ते आठ तास मोबाइलवर फेसबुक आणि इंस्टाग्राम पाहण्यात घालवतो असं वक्तव्य काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलं आहे. राहुल गांधी …
Read More »जिवोत्तम कामत यांचे मरणोत्तर देहदान; जायंट्स आय फौंडेशनचा पुढाकार
बेळगाव : मंगळवार पेठ टिळकवाडी येथील रहिवासी जिवोत्तम यांचे वयाच्या ७६ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात भाऊ, बहीण आणि पुतण्या असून ते अविवाहित होते. त्यांच्या निधनाची माहिती मिळताच जायंट्स आय फौंडेशनचे संस्थापक मदन बामणे तसेच अध्यक्ष शिवराज पाटील, विजय बनसुर यांनी त्यांच्या कुटुंबियांना भेटून देहदानाबद्दल माहिती …
Read More »जिल्हा प्रशासनातर्फे राष्ट्रीय ग्राहक दिन उत्साहात साजरा
बेळगाव : बेळगाव जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक व्यवहार खाते, जिल्हा ग्राहक आयोग कायदेशीर मेट्रोलॉजी विभाग, शिक्षण विभाग, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जनसंपर्क विभाग, अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता खाते, डीसीआयसी आणि इतर खात्यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय ग्राहक दिन -2023 आज गुरुवारी मोठ्या उत्साहात साजरा …
Read More »अतिथी व्याख्यात्यांचे सेवासुरक्षेसाठी एका पायावर उभे राहून अनोखे आंदोलन
बेळगाव : सेवेत कायम करावे या मागणीसाठी बेळगाव जिल्हा प्रथम श्रेणी महाविद्यालयांच्या अतिथी व्याख्याता संघटनेच्या सदस्यांनी आज एका पायावर उभे राहून अनोखे आंदोलन केले. शासकीय प्रथम श्रेणी महाविद्यालयात कार्यरत व्याख्यात्यांना सेवेत कायम करावे, त्यांना सामाजिक सुरक्षा देण्यात यावी, आदी मागण्यांसाठी अतिथी व्याख्यात्यांनी बेळगावात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत एका …
Read More »माजी आमदार रघुनाथराव कदम यांची पुण्यतिथी गांभीर्याने
निपाणी (वार्ता) : येथील मराठा मंडळ शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, माजी आमदार, उद्योजक रघुनाथराव विठ्ठलराव कदम यांची पुण्यतिथी गुरुवारी (ता.२८) येथील मराठा मंडळ सांस्कृतिक भवनात गांभीर्याने झाली. त्यानिमित्त त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी निपाणी व परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. येथील मराठा मंडळ संस्कृतीक भवनात निपाणी भाग काँग्रेस अध्यक्ष राजेश …
Read More »निपाणीतील शिबिरात ८४ रुग्णांना श्रवणयंत्र वाटप
निपाणी (वार्ता) : येथील रोटरी क्लब, बेळगाव रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम आणि अमेरिकेतील बर्मींग होमच्या संयुक्त विद्यमाने येथील रोटरी क्लबमध्ये मोफत श्रवण यंत्राचे वितरण करण्यात आले. रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रवीण उर्फ विरू तारळे यांनी स्वागत केले. निपाणी परिसरात प्रथमच या श्रवण यंत्राचे वितरण करण्यात आले. यावेळी वैद्यकीय तपासणीनंतर सुमारे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta