पाचवी, आठवी, नववी, ११ वीच्या परीक्षा होणार वेळापत्रकानुसार बंगळूर : एका महत्त्वपूर्ण घडामोडीत, उच्च न्यायालयाच्या विभागीय पीठाने गुरुवारी इयत्ता पाचवी, आठवी, नववी आणि ११ वीच्या बोर्डाच्या परीक्षा घेण्यास परवानगी दिली. कालच उच्च न्यायालयाच्या एक सदस्य पीठाने या वर्गांच्या बोर्ड परीक्षा घेण्यास स्थगिती दिली होती. काल, उच्च न्यायालयाच्या विभागीय खंडपीठाने, …
Read More »येळ्ळूर ग्रामपंचायत सदस्या सौ. राजकुंवर पावले यांचा येळ्ळूर साहित्य संघाच्यावतीने सत्कार
येळ्ळूर : येळ्ळूर ग्रामपंचायत सदस्या सौ. राजकुंवर तानाजी पावले यांची बेळगाव दक्षिण भाजपाच्या जनरल सेक्रेटरी पदी निवड झाल्याबद्दल येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाचे अध्यक्ष परशराम मोटराचे हे होते. येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्या वतीने कार्याध्यक्ष प्रा. …
Read More »शिक्षक पिढी घडवतात : संदीप पाटील
कमलेश कर्णिक यांना चंदगड प्रेरणा पुरस्काराने सन्मानित चंदगड : “शिक्षक पिढी घडवतो आणि घडलेली पिढी समाजाची घडी बसवण्याचं काम करते. शिक्षण माणसाच्या आयुष्यात उजेड बनून येतं आणि माणसाचं जीवन उजळवून टाकतं. म्हणून महत्त्वाचे असतात शिक्षक… जे आपल्यासाठी ज्ञानदानाचे काम करतात आणि आपल्या उज्वल भविष्यासाठी वर्तमान सुधारतात. शिक्षकाची जबाबदारी फार …
Read More »बेळगाव जाएंट्स परिवारच्यावतीने महिला दिन पुरस्कार जाहीर
बेळगाव : सालाबादप्रमाणे या वर्षीही बेळगावच्या जाएंटस ग्रुप ऑफ परिवार बेळगाव यांच्यावतीने जागतिक महिला दिन साजरा करण्यात येणार आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने यावर्षीही विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांना सन्मानित करण्यात येणार आहे. शाल, श्रीफळ, षुष्प आणि भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला शहापूर भारतनगर लक्ष्मी रोड येथील महागणपती …
Read More »मराठीचे खरे मारेकरी कोण?
(२) बेळगाव : सीमाभागात आता प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचा राजकीय पाडाव करून आसुरी आनंद मिळविणाऱ्या कर्नाटक सरकारने आता सीमाभागात पुन्हा एकदा कन्नडसक्तीचा वरवंटा फिरवला आहे. १९८६ साली ज्या अन्यायकारक नियमांची सुरुवात झाली त्याचा कळस गाठण्याचे काम सध्या सुरू असल्याची प्रचिती सीमाभागातील मराठी जनतेला येत आहे. …
Read More »सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत सीमाभागावर दावा करू नये; माहिती हक्कद्वारे उघड
बेळगाव : सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे, त्यामुळे न्यायालयाचा अंतिम निकाल येईपर्यंत दोन्ही राज्यांनी एकमेकांच्या जमिनीवर दावा करू नये, तसेच या भागातील नागरिकांच्या संरक्षणासाठी उपाययोजना कराव्यात, अशी स्पष्ट माहिती गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर झालेल्या दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत देण्यात आली होती, अशी माहिती महाराष्ट्र एकीकरण युवा समितीकडून मागविण्यात आलेल्या …
Read More »शिक्षणाबरोबर, संस्कारांचे महत्त्व जाणून घेणे आवश्यक : गोविंद टक्केकर
बेळगाव : शिक्षणाच्या माध्यमातून जीवनाची प्रगती साध्य करता येते मात्र शिक्षणाबरोबरच जीवनात संस्कारांचे महत्त्व मोठे आहे याचे महत्त्व पालकांनी जाणून घेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन श्रीराम बिल्डर्स संचालक आणि सामाजिक कार्यकर्ते गोविंद टक्केकर यांनी केले. शहापूर कचेरी गल्ली येथील सनशाईन स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन थाटात पार पडले. नेताजी सांस्कृतिक भवन येथे …
Read More »उद्योजक गोविंद टक्केकर, अंजली पाटील यांचा सन्मान
बेळगाव : येथील विश्व भारती कला क्रीडा संघटनेतर्फे उद्योजक कुस्ती आश्रयदाते दानशूर नेतृत्व गोविंद टक्केकर व समाजसेविका अंजली पाटील यांचा सन्मान सिद्धार्थ बोर्डिंग शहापूर येथे संपन्न झाला. अध्यक्षस्थानी माजी आमदार परशुरामभाऊ नंदीहळ्ळी उपस्थित होते. प्रास्ताविक वाय. पी. नाईक यांनी केले. मान्यंवरांचे स्वागत दामोदर कणबरकर यांनी गुलाब पुष्प देऊन केले. …
Read More »लष्करात निवड झालेल्या कुर्ली हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा सत्कार
निपाणी (वार्ता) : रयत शिक्षण संस्थेच्या कुर्ली येथील सिद्धेश्वर विद्यालयाच्या १० माजी विद्यार्थ्यांची लष्करात निवड झाली आहे. त्यांच्या निवडीबद्दल विद्यालयातर्फे सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस. एस. चौगुले होते. टी. एम. यादव यांनी स्वागत केले. मुख्याध्यापक चौगुले यांच्या हस्ते गिरीश लोहार, सुमित पाटील, संकेत पोवार, प्रथमेश देसाई, विजय व्हराटे, …
Read More »पूजा शेलार ठरल्या पैठणीच्या मानकरी
निपाणीत होम मिनिस्टर स्पर्धा ; १०० पेक्षा अधिक महिलांचा सहभाग निपाणी (वार्ता) : महादेव गल्लीतील महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त आयोजित ‘होम मिनिस्टर’ स्पर्धेत पूजा प्रमोद शेलार यांनी पैठणी पटकावली. श्रुती संदीप मुत्तगी यांनी दुसऱ्या क्रमांकाची चांदीची समई आणि शितल संजय घाटगे यांनी तिसऱ्या क्रमांकाची एलईडी टीव्ही पटकावली. लक्ष्मी सुभाष माळकरी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta