बेळगाव : भारतीय राजकारणाच्या इतिहासात महत्त्वपूर्ण ठरलेल्या बेळगावमध्ये 1924 साली महात्मा गांधीजींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या काँग्रेस अधिवेशनाचा शताब्दी महोत्सव 26 आणि 27 डिसेंबर रोजी भव्यपणे साजरा करण्यात येईल, अशी माहिती एआयसीसी राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी दिली. आज बेळगाव येथील काँग्रेस कार्यलयात राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, रणदीपसिह सुरजेवाला, …
Read More »भीमगड परिसरातील 754 कुटुंबे व 3059 गावकऱ्यांचे टप्प्याटप्प्याने स्थलांतर : मंत्री ईश्वर खंड्रे
तळेवाडी जंगलात वनमंत्र्यांची ग्रामस्थांशी बैठक खानापूर : भीमगड वनपरिक्षेत्रातील गावांतील रहिवाशांना योग्य मोबदला देऊन त्यांचे टप्प्याटप्प्याने स्थलांतर केले जाईल, असे आश्वासन वन, जीवशास्त्र आणि पर्यावरण मंत्री ईश्वर खांड्रे यांनी दिले आहे. सोमवारी रात्री मंत्री खांड्रे यांनी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह तळेवाडीला भेट देऊन ग्रामस्थांची बैठक घेतली. यावेळी सरकार स्थलांतरित गावकऱ्यांना …
Read More »संत मीरा शाळेच्या प्राथमिक विभागाच्या क्रीडा स्पर्धेला प्रारंभ
बेळगाव : अनगोळ येथील येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या प्राथमिक विभागाच्या क्रीडा स्पर्धेला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे माजी राष्ट्रीय हँडबॉल खेळाडू सिद्धांत वर्मा तसेच राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू प्रियांका पाटील, गीता वरपे, चंद्रकांत तुर्केवाडी उपस्थित होते प्रारंभी पाहुण्यांचे हस्ते क्रीडाध्वजारोहण करण्यात आले, …
Read More »मराठी विद्यानिकेतन शाळेचा वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न
बेळगाव : शुक्रवार दिनांक 13 डिसेंबर व शनिवार दिनांक 14 डिसेंबर 2024 या दोन दिवसात मराठी विद्यानिकेतन शाळेचा वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात पार पाडला. क्रीडा महोत्सव उद्घाटनासप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून केदनूर माध्यमिक शाळेचे क्रीडाशिक्षक आर. एन. पाटील सर उपस्थित होते. सर्वप्रथम पाहुण्यांचे क्रीडांगणामध्ये आगमन त्यानंतर पाहुण्यांचे स्वागत मुख्याध्यापक …
Read More »५ विद्यार्थ्यांना ब्लॅक बेल्ट प्रदान
बेळगाव : दि. १४ डिसेंबर २०२४ रोजी येथील अनन्या फार्म हाऊस मन्नुर येथे कराटेची बेल्ट परीक्षा पार पडली. या परीक्षेत एकूण ७५ कलर बेल्ट कराटेपटू सहभागी झाले होते.तर धनविता कुलाल, तेजस्विनी देसाई, सात्विक शानभाग, अमिषा होनगेकर व श्रेया चौगुले या ५ विद्यार्थ्यांना ब्लॅक बेल्ट प्रदान करण्यात आला. हे विद्यार्थी …
Read More »कर्णबधिरांच्या मागण्यांसाठी सुवर्णसौधसमोर आंदोलन
बेळगाव : कर्णबधिरांच्या विविध मागण्यांसाठी कर्नाटक राज्य कर्णबधिर संघटनेच्या नेतृत्वाखाली सुवर्णसौधसमोर शेकडो कर्णबधिरांनी आंदोलन केले असून, सरकारकडून न्याय मागण्यात आला आहे. कर्णबधिरांच्या न्याय्य मागण्यांकडे सरकारने लक्ष द्यावे, या मागणीसाठी आज सुवर्णसौधसमोर मोठ्या प्रमाणात कर्णबधिरांनी आंदोलन केले. कर्नाटक राज्य कर्णबधिर संघटनेच्या वतीने आयोजित या आंदोलनात शेकडो आंदोलकांनी भाग घेतला. कर्नाटक …
Read More »पंचमसाली आंदोलनात पोलिसांकडून बॅनर जप्त
बेळगाव : पंचमसाली समाजाच्या आंदोलनात आज पुन्हा एक नवा वाद निर्माण झाला आहे. लाठीचार्जच्या फोटोंसह बॅनर लावल्याने पोलिसांनी तो जप्त केला. यामुळे पोलिस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये वादावादी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. पंचमसाली समाजाच्या आंदोलनात आज डॉ. बी. आर. आंबेडकर उद्यानात पुन्हा एकदा हायड्रामा पाहायला मिळाला. सुवर्ण सौध परिसरात झालेल्या लाठीचार्जचे …
Read More »हुक्केरीतील चोरी प्रकरणांचा दोन दिवसांत लावला छडा
हुक्केरी : हुक्केरी शहरात दोन दिवसांपूर्वी झालेल्या चोरीच्या दोन गुन्ह्यांची उकल करण्यात हुक्केरी पोलीस निरीक्षक महांतेश बसापुरे यांना यश आले आहे. शहरातील बुद्ध बसव आंबेडकर सहकारी संस्था व किराणा दुकानात झालेल्या चोरी प्रकारचा छडा ४८ तासांत लावून आरोपीला पकडून हुक्केरी न्यायालयाच्या ताब्यात दिले. बेळगावचे पोलीस अधीक्षक भीमा शंकर …
Read More »७०% गुडघेदुखीच्या रुग्णांना शस्त्रक्रिया करण्याची गरज लागत नाही
बेळगाव : मानवी शरीरातील सांध्याची प्रतिबंधात्मक काळजी व त्यावरील अत्याधुनिक उपचार या विषयी दि. ११ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता पुण्यातील लोकमान्य हॉस्पिटलच्या आंतरराष्ट्रीय कीर्तीचे डॉ. नरेंद्र वैद्य यांच्या टीम मधील डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी वरेरकर नाट्य गृहामधील कार्यक्रमात उपस्थितना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार श्री. जगदीश कुंटे …
Read More »मणतूर्गा येथील रवळनाथ मंदिराचा कळस बांधकाम समारंभ
खानापूर : मणतूर्गा येथे सोमवार दिनांक 16 डिसेंबर 2024 रोजी रवळनाथ मंदिराचे कळस बांधकाम करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वतनदार नारायण महादेव पाटील हे होते. रवळनाथ पूजन श्री रवळनाथ जीर्णोद्धार समिती सदस्य नामदेव गुंडू गुरव पुजारी यांच्या हस्ते करण्यात आले तर मंदिराचा कळस बांधकाम शुभारंभ उद्योजक व माजी अध्यक्ष श्री …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta