Sunday , July 26 2026
Breaking News

मराठा मंडळ इंग्रजी माध्यम शाळा खादरवाडी यांच्यातर्फे शिवजयंती साजरी

Spread the love

 

बेळगाव : आज १९ फेब्रुवारी २०२५ रोजी मराठा मंडळ इंग्रजी माध्यम शाळा खादरवाडी यांच्यातर्फे आज भव्य अशी शिवजयंतीची मिरवणूक काढण्यात आली. खादरवाडी गाव भगवेमय करण्यात आले.

मिरवणुकीमध्ये ढोल-ताशा पथक, लाठीमेळा,लेझीम-मेळा, मल्लखांब, तलवार बाजी व ट्रॅक्टरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज व मासाहेब जिजाऊ आणि अनेक मर्दानी शूर मावळे वेशभूषा सादर करुन सर्व खादरवाडी ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले.
शाळेच्या मुख्याध्यापिका वनश्री नायर व क्रीडाशिक्षक अतुल शिरोले यांनी थोडक्यात माहिती सांगितले. तेव्हा सर्व शिक्षकवर्ग व ग्रामस्त उपस्थित होते.

मिरवणुकीवेळी घरोघरी पाणी घालून व आरती करून सर्वांच स्वागत करत मिरणूक जोरदार केली. यासाठी शाळेच्या अध्यक्षा डॉ. राजश्री नागराजू (हलगेकर) यांचे बहुमूल्य प्रोत्साहन मिळत आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *