बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित नेताजी हायस्कूल सुळगे (ये) या ठिकाणी दहावीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा व पारितोषक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा मंडळाचे ज्येष्ठ सदस्य श्री. आर. एस. नंद्याळकर होते. तर व्यासपीठावर प्रमुख वक्ते श्री. पी. जी. पाटील सर, शाळा सुधारणा मंडळाचे अध्यक्ष श्री. बी. बी. पाटील सर, उपाध्यक्ष श्री. भाऊराव होनगेकर, श्री. एन. आर. पाटील, श्री. पांडुरंग कोळशेकर,व सामाजिक कार्यकर्ते श्री. रवींद्र पाटील आणि श्री. प्रभाकर नावगेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनींच्या इशस्तवन व स्वागत गीताने झाली. यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व फोटो पूजन करून कार्यक्रमाला औपचारिक रित्या सुरुवात झाली. याप्रसंगी हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. टी. वाय. भोगण यांनी आपल्या प्रास्ताविक पर भाषणात उपस्थित पाहुण्यांचे शब्दसुमनाने स्वागत करून दहावीच्या विद्यार्थ्यांना सदिच्छा दिल्या. त्यानंतर विद्यार्थिनींच्या वतीने कुमारी प्रिया श्रीकांत पाटील, कुमारी करुणा रमेश गडकरी व सेजल मधुकर थोरवत यांनी आपले मनोगत व्यक्त करून शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. शिक्षकांच्या वतीने श्रीमती आर. एस. कंग्राळकर मॅडम यांनी मार्गदर्शन केले. तर सहशिक्षक श्री. एम. पी. कंग्राळकर यांनी स्वलिखित कविता सादर केल्या.
याप्रसंगी श्री. ए. बी. पाटील यांनी पारितोषिक विजेत्या विद्यार्थ्यांची नावे घोषित करून मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.
यानंतर प्रमुख वक्ते श्री. पी. जी. पाटील यांनी विद्यार्थ्यांना जीवनात कठोर परिश्रम घेऊन अभ्यास करावे व उत्कृष्ट गुण घेऊन आदर्श नागरिक बनण्याचे आवाहन केले. यावेळी श्री. पांडुरंग कोळशेकर तसेच भाऊराव होनगेकर यांनी आपल्या भाषणातून दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. यानंतर व्यासपीठावर उपस्थित श्री. बी. बी. पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी भीती न बाळगता आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे कोणताही ताण तणाव न घेता धैर्याने प्रयत्न केल्यास यश नक्की मिळते असा मोलाचा सल्ला दिला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. एस. वाय. व्हंडेकर मॅडम यांनी तर आभार प्रदर्शन श्री. जे. जे. पाटील यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta