Friday , August 21 2026
Breaking News

मराठी विद्यानिकेतनमध्ये साने गुरुजी पुण्यतिथी साजरी

Spread the love

 

बेळगाव : मराठी विद्यानिकेतनमध्ये 11 जून रोजी साने गुरुजी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून शाळेतील शिक्षिका मुक्ता आलगोंडी उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते साने गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. इयत्ता चौथी ‘अ’मधील विद्यार्थ्यांनी वर्गशिक्षिका मनिषा सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली साने गुरुजींच्या जीवनाबद्दल भित्तीपत्रके तयार केली. यामध्ये साने गुरुजींच्या कविता, साने गुरुजींचा परिचय, साने गुरुजींची चित्रे रेखाटण्यात आली आहेत. चौथी ‘अ ‘वर्गातील आस्था बांबूगडे हिने साने गुरुजींच्या जीवनातील छोटीशी गोष्ट सादर केली.
शाळेच्या शिक्षण संयोजिका नीला आपटे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी.जी. पाटील, सांस्कृतिक विभाग प्रमुख धीरजसिंह राजपूत, शिक्षक समन्वयक सविता पवार, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

शारदा विद्यालयात मोफत नेत्रतपासणी शिबिर

Spread the love    बेळगाव : शहापूर येथील शारदा विद्यालय इंग्रजी माध्यम शाळेत बुधवार, दि. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *