Friday , August 21 2026
Breaking News

पती-प्रियकराकडून महिलेचे खासगी फोटो व्हायरल; दोघांविरुद्ध गुन्हा

Spread the love

 

बेळगाव : सदाशिवनगर येथील एका विवाहित महिलेचे खासगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी तिच्या पती व प्रियकराविरुद्ध सायबर क्राईम विभागात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दोघांविरुद्ध एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ३७ वर्षीय विवाहित महिलेचे शिमोगा जिल्ह्यातील तिच्याच नात्यातील एका युवकासोबत गेल्या सहा वर्षांपासून संबंध होते. या काळात संबंधित युवकाने तिला भेटण्यासाठी शिमोगा व हुबळी येथे बोलावल्याचे सांगितले जाते.

दरम्यान, युवकाने महिलेसोबतच्या खासगी क्षणांचे छायाचित्रे आपल्या मोबाईलमध्ये संग्रहित करून ती महिलेच्या पतीकडे पाठविल्याचा आरोप आहे. त्यानंतर पतीनेही ही छायाचित्रे नातेवाईकांसह इतरांकडे पाठवून सोशल मीडियावर प्रसारित केल्याचे तपासात समोर आले आहे.

खासगी फोटो व्हायरल झाल्यामुळे मानसिक त्रास झाल्याचे नमूद करत महिलेने सायबर क्राईम विभागाकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पती आणि प्रियकराविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

About Belgaum Varta

Check Also

चनम्मा नगर, उद्यमबाग परिसरात खुलेआम गांजाची विक्री; उचगावच्या तरुणाला बेड्या

Spread the love  १ किलो २१२ ग्रॅम गांजासह मोटारसायकल, मोबाईल जप्त; १.०३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *