Tuesday , August 25 2026
Breaking News

इंडियन रेड क्रॉस सोसायटीतर्फे प्रथमोपचार व सीपीआर जनजागृती कार्यक्रम संपन्न

Spread the love

 

बेळगाव : एखाद्या आजारी किंवा जखमी व्यक्तीला वैद्यकीय उपचार मिळेपर्यंत त्याचा जीव वाचवण्यासाठी केले जाणारे प्रयत्न म्हणजे प्रथमोपचार होय. त्यामुळे प्रत्येक नागरिकाला प्रथमोपचार आणि सीपीआर (हृदय व फुफ्फुसांचे पुनरुज्जीवन) याची मूलभूत माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन इंडियन रेड क्रॉस सोसायटी (IRCS)च्या खजिनदार लेफ्टनंट कर्नल विनोदिनी शर्मा यांनी केले.

इंडियन रेड क्रॉस सोसायटीतर्फे श्रीक्षेत्र पंत बाळेकुंद्री येथील श्री दत्त देवस्थानाच्या सभागृहात ‘प्रथमोपचार आणि सीपीआर (हृदय व फुफ्फुसांचे पुनरुज्जीवन)’ या विषयावर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयआरसीएसचे चेअरमन डॉ. व्ही. डी. डांगे, सेक्रेटरी एस. एन. मुलीमनी, वरिष्ठ सदस्य प्रवीण हिरेमठ, दत्त संस्थानचे सचिव ईश्वर पाटील, प्रकाश जोशी, पीआरओ नागेंद्र मधाळे, सुधाकर खोत, डॉ. महादेव नांदुरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात लेफ्टनंट कर्नल विनोदिनी शर्मा यांनी विविध आपत्कालीन प्रसंगांमध्ये प्रथमोपचार कसा करावा, सीपीआर कधी आणि कशा पद्धतीने द्यावा, याचे प्रात्यक्षिकासह सविस्तर मार्गदर्शन केले. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून वेळेवर दिलेला प्रथमोपचार एखाद्या व्यक्तीचा जीव वाचवू शकतो, असे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनीही प्रथमोपचाराचे महत्त्व अधोरेखित करणारे मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला स्थानिक नागरिक, शिक्षक, कर्मचारी तसेच श्रीक्षेत्र पंत बाळेकुंद्री श्री दत्त देवस्थानाचे सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

ईद-ए-मिलादनिमित्त बेळगावात वाहतूक मार्गात मोठे बदल; २६ ऑगस्टला सकाळी ८ पासून निर्बंध

Spread the love बेळगाव : ईद-ए-मिलाद सणानिमित्त २६ ऑगस्ट रोजी बेळगाव शहरात मिरवणूक काढण्यात येणार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *