Tuesday , August 25 2026
Breaking News

दर शुक्रवारी धावणार पंढरपूर–यशवंतपुर एक्सप्रेस; मिरज–बेळगाव–हुबळी मार्गे प्रवासाला नवी जोडणी

Spread the love

 

बेळगाव : नैऋत्य रेल्वेने प्रवाशांसाठी महत्त्वाची घोषणा केली असून पंढरपूर ते यशवंतपुर (बेंगळुरू) दरम्यान नवीन साप्ताहिक एक्सप्रेस रेल्वे सेवा सुरू करण्यात आली आहे. ही रेल्वे मिरज, बेळगाव आणि हुबळी मार्गे धावणार असून दर शुक्रवारी एकदा ही सेवा उपलब्ध राहणार आहे.

सुमारे 880 किलोमीटरचा प्रवास ही गाडी अंदाजे 15 तास 50 मिनिटांत पूर्ण करणार आहे. आधुनिक सुविधा असलेल्या या गाडीला एकूण 21 डबे जोडण्यात आले असून यात एसी, स्लीपर आणि जनरल कोचचा समावेश आहे.

प्रवास मार्ग व वेळापत्रक
पंढरपूर येथून दुपारी 1:35 वाजता सुटणारी ही गाडी सांगोला, मिरज, रायबाग, घटप्रभा, बेळगाव, धारवाड, हुबळी, हावेरी, हरिहर, दावणगेरे, बिरूर जंक्शन, अरसीकेरे, तुमकूर मार्गे यशवंतपुर येथे पहाटे 5:25 वाजता पोहोचणार आहे.

मिरज येथे इंजिनची दिशा बदलली जाणार असून विविध स्थानकांवर ठराविक थांबे देण्यात आले आहेत.

तिकीट दर (अंदाजे)
प्रथम श्रेणी एसी – ₹2925
द्वितीय श्रेणी एसी – ₹1750
तृतीय श्रेणी एसी – ₹1235
स्लीपर – ₹470
जनरल – ₹230

कोच रचना
या रेल्वेमध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय श्रेणी एसी, स्लीपर तसेच जनरल डबे, पँट्री कार आणि गार्ड डबे यांचा समावेश असणार आहे.

बेळगाव आणि उत्तर कर्नाटकातील प्रवाशांसाठी ही सेवा महत्त्वाची ठरणार असून पंढरपूर–बेंगळुरू प्रवास अधिक सुलभ व जलद होणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

इस्कॉनतर्फे शुक्रवारी बलराम जयंती

Spread the love  बेळगाव : भगवान बलराम यांचा प्राकट्य दिवस हा इस्कॉन चळवळीमध्ये बलराम जयंती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *