Tuesday , August 18 2026
Breaking News

गणपत गल्लीतील सराफी दुकानात दागिने चोरण्याचा प्रयत्न; संशयिताला नागरिकांनी पकडले

Spread the love

 

बेळगाव : शहरातील गजबजलेल्या गणपत गल्ली परिसरातील एका सराफी दुकानात दागिने चोरण्याचा प्रयत्न झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने दुकानात आलेल्या एका संशयित तरुणाने सोन्याचे कानातले घेऊन पसार होण्याचा प्रयत्न केला. मात्र दुकानदाराच्या सतर्कतेमुळे त्याचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी सुमारे पाचच्या सुमारास संबंधित तरुण सराफी दुकानात आला. त्याने सोन्याचे कानातले पाहण्याची इच्छा व्यक्त केली. दुकानदाराने दोन जोड कानातले दाखविले. यावेळी दुकानदाराचे लक्ष दुसरीकडे असताना संशयिताने एक जोड कानातले लपवून दुकानाबाहेर जाण्याचा प्रयत्न केला. वजन करताना दागिने कमी असल्याचे दुकानदाराच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा केला.

आरडाओरडा ऐकून परिसरातील नागरिकांनी संशयिताला पकडले. संतप्त जमावाने त्याला मारहाण केल्याची माहिती आहे. त्याच्याकडून सुमारे चार ग्रॅम वजनाचे सोन्याचे टॉप्स जप्त करण्यात आल्याचे सांगितले जाते.

घटनेची माहिती मिळताच खडेबाजार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संशयिताला ताब्यात घेतले. पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू असून या घटनेमुळे गणपत गल्लीतील व्यापाऱ्यांमध्ये काही काळ खळबळ उडाली.

About Belgaum Varta

Check Also

विद्यानगर अनगोळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची कार्यकारिणी जाहीर

Spread the love  अमित हलगेकर अध्यक्ष, श्याम गौंडाडकर उपाध्यक्ष; सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे वाटचाल बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *