Tuesday , August 18 2026
Breaking News

बेळगावात गांजा विक्रीवर पोलिसांचा छापा; दोघांना अटक

Spread the love

 

बेळगाव : शहरातील वेंगुर्ला रोडवरील गांधी सर्कल परिसरात बेकायदेशीररित्या गांजा विक्री करणाऱ्या दोघांना कॅम्प पोलिसांनी अटक केली. आरोपींकडून गांजा, रोख रक्कम आणि मोबाईल असा एकूण २४ हजार ७३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे कौशिक कृष्ण मुदलियार (२२, लक्ष्मी नगर, गणेशपूर) आणि चंद्रकांत अनिल थापा (१९, ज्योती नगर) अशी आहेत. कॅम्प पोलीस ठाण्याचे पीएसआय आर. आय. सनदी यांच्या पथकाने ४ ऑगस्ट रोजी छापा टाकून ही कारवाई केली.

प्राथमिक तपासात आरोपी गंगवाडी परिसरातील मंजुनाथ नावाच्या व्यक्तीकडून गांजा आणून त्याची विक्री करत असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आरोपींकडून २ किलो ६० ग्रॅम गांजा, १,७३० रुपये रोख आणि दोन मोबाईल फोन जप्त केले आहेत.

या प्रकरणाचा पुढील तपास कॅम्प पोलीस ठाण्याकडून सुरू असून, कारवाई करणाऱ्या पोलिस पथकाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ; ७५ वर्षीय वृद्धावर जीवघेणा हल्ला

Spread the love  महांतेश नगरमध्ये संतापजनक घटना; पाय व मांडीला सात-आठ वेळा चावा, मोठ्या प्रमाणात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *