Tuesday , August 18 2026
Breaking News

कंत्राटी वसतिगृह कर्मचाऱ्यांचा बेळगावात मोर्चा; किमान वेतन व थकीत पगाराची मागणी

Spread the love

 

बेळगाव : कर्नाटक राज्य सरकारी वसतिगृह व निवासी शाळांमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढत सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली. आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन सादर करण्यात आले.

संघटनेचे राज्य सहसचिव प्रदीम तळवार यांनी सांगितले की, सरकारने जाहीर केलेल्या किमान वेतनाची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे. दिवसभर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना किमान २१ हजार रुपये वेतन, साप्ताहिक सुट्टी, भविष्य निर्वाह निधी (PF), ईएसआय, गणवेश व ओळखपत्र यांसारख्या सुविधा तातडीने लागू कराव्यात, अशी त्यांनी मागणी केली.

आंदोलक कर्मचाऱ्यांनी चार महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याचा आरोप करत घरभाडे, मुलांचे शिक्षण आणि दैनंदिन खर्च भागविणे कठीण झाल्याची व्यथा मांडली. तसेच थकीत वेतन तातडीने अदा करून प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेपूर्वी पगार जमा करावा, अशी मागणी करण्यात आली.

या आंदोलनात बेळगाव जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील शेकडो कंत्राटी कर्मचारी सहभागी झाले होते.

About Belgaum Varta

Check Also

भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ; ७५ वर्षीय वृद्धावर जीवघेणा हल्ला

Spread the love  महांतेश नगरमध्ये संतापजनक घटना; पाय व मांडीला सात-आठ वेळा चावा, मोठ्या प्रमाणात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *