Friday , October 23 2026
Breaking News

एसटीएमच्या आई भवानी देवीला श्री एकदंत युवक मंडळातर्फे चांदीचा हार अर्पण

Spread the love

 

 

बेळगाव : समर्थ नगर येथील श्री एकदंत युवक मंडळ आणि एसटीएम संचलित श्री दुर्गाशक्ती महिला मंडळाच्या वतीने एसटीएमच्या आई भवानी देवीला बुधवार, दि. १४ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ओटी भरून चांदीचे हार अर्पण करण्यात आले. यावेळी परिसरातील श्री रेणुका देवी मंदिर, समर्थ नगर कॉर्नर तसेच जागृत श्री ब्रह्मदेव मंदिर येथेही ओटी भरण्याचा धार्मिक कार्यक्रम पार पडला.

या कार्यक्रमात मोठ्या संख्येने महिलांनी कलश, गुढी व आरती घेऊन मिरवणुकीत सहभाग घेतला. मिरवणुकीदरम्यान विविध देवतांचा जयघोष करण्यात आला. अनेक मुलींनी देवीचे रूप धारण करून पारंपरिक वेशभूषेत सहभाग घेतल्याने कार्यक्रमाला विशेष आकर्षण प्राप्त झाले.

देवीच्या जयघोषाने आणि भक्तिमय वातावरणाने समर्थ नगर परिसर दुमदुमून गेला होता. धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर महाआरती करण्यात आली. त्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी समर्थ नगरमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

आंतरराष्ट्रीय ख्यातीची जंबो सर्कस 25 आॕक्टो.पर्यंत सीपीएड मैदानावर

Spread the love  बेळगांव : जगप्रसिद्ध जंबो सर्कस बेळगाव शहरात दाखल झाली असून, आंतरराष्ट्रीय कलाकारांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *