


बेळगाव : केळकर बाग येथील ‘बेळगावची आदिशक्ती’च्या मंडपात पाचव्या माळेनिमित्त आयोजित भजन संध्येने भक्तिरसाची बरसात झाली. भाग्यनगर येथील श्री रेणुका भजनी मंडळाने सादर केलेल्या भक्तिगीतांनी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला.
गुरु शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या भजन संध्येत देवी-देवतांच्या भक्तिगीतांचे सादरीकरण करण्यात आले. सुरेल भजनांनी उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. भजनांच्या तालावर आणि भक्तिरसात तल्लीन होत नागरिकांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला.
भाविकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पाचव्या माळेचा उत्सव भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला.

Belgaum Varta Belgaum Varta