


निपाणी (वार्ता) : निपाणी येथील साईशंकरनगर मधील सर्वे क्रमांक १६१ आणि १६२ मधील एक एकर खुली जागा केवळ उद्यानासाठीच राखीव ठेवण्यात यावी. ती जागा कोणत्याही इतर खाजगी संस्थेला हस्तांतरित करू नये, या मागणीसाठी गुरुवारी (ता.१५) साईशंकर नगर मधील रहिवाशांनी येथील नगरपालिकेवर धडक मारत प्रशासनाला निवेदन दिले.
या जागेवर नागरिकांच्या हक्काचे उद्यान साकारण्यात यावे, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली. चिक्कोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांच्या नेतृत्वाखाली माजी नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पालिकेचे लक्ष वेधले. यावेळी माजी नगरसेवक रवींद्र शिंदे, अनिता पठाडे, सुनील संकपाळ, दत्ता नाईक, संजय पावले, दिलीप पठाडे, ॲड. संजय चव्हाण, बी.बी. बेडकिहाळे, शिशिकुमार गोरवाडे, बी. बी. पाटील, जयवंत भोसले, सुनील बल्लोळ, गजानन शिंदे, रमेश पै, अस्लम शिकलगार यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta