Friday , October 23 2026
Breaking News

मतचोरीविरोधात उद्या बेळगावात धरणे आंदोलन; मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी

Spread the love

 

बेळगाव : मतचोरीविरोधात आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी राज्यघटना बचाव समितीच्या वतीने शुक्रवार, दि. १६ ऑक्टोबर रोजी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

या आंदोलनात प्रगतिशील लेखक संघ, अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) यांचे कार्यकर्ते तसेच लोकशाहीप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन राज्यघटना बचाव समितीने केले आहे.

हे आंदोलन शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होणार आहे. समितीचे निमंत्रक प्रा. आनंद मेणसे, कृष्णा शहापूरकर, अनिल आजगावकर, शंकरराव चौगुले आणि जे. बी. अगसीमनी यांनी नागरिकांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

आंतरराष्ट्रीय ख्यातीची जंबो सर्कस 25 आॕक्टो.पर्यंत सीपीएड मैदानावर

Spread the love  बेळगांव : जगप्रसिद्ध जंबो सर्कस बेळगाव शहरात दाखल झाली असून, आंतरराष्ट्रीय कलाकारांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *