Friday , October 23 2026
Breaking News

मण्णूरच्या गायरान जमिनी वाचवण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Spread the love

 

भूसंपादन थांबवण्याची मागणी; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा

बेळगाव : तालुक्यातील मण्णूर गावातील शासकीय गायरान जमिनी विविध प्रकल्पांसाठी अधिग्रहित करण्याच्या हालचालींना ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. या जमिनींचे संरक्षण करण्याच्या मागणीसाठी देवस्की पंच कमिटी आणि गावातील प्रमुख व्यक्तींच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.

मण्णूर गावातील ७५ टक्क्यांहून अधिक नागरिक शेती आणि पशुपालनावर अवलंबून आहेत. गावात आधीच जमिनीची कमतरता असताना सर्व्हे क्रमांक १०१ मधील क्रीडांगणाची जागा आश्रय योजनेसाठी वापरण्याचे तसेच सर्व्हे क्रमांक १४७ मध्ये कचरा प्रकल्प उभारण्यासाठी सुरू असलेले सर्वेक्षण तातडीने थांबवावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.

सर्व्हे क्रमांक ५ मधील जागेवर दरवर्षी धार्मिक रेणुका यात्रा आणि दसरा सीमोल्लंघनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. त्यामुळे या जागेचे मूळ स्वरूप कायम ठेवून तिचे संरक्षण करावे, अशी विनंतीही निवेदनातून करण्यात आली आहे.

गायरान जमिनी जनावरांच्या चाऱ्यासाठी तसेच गावाचा सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा जपण्यासाठी महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे भूसंपादनाची प्रक्रिया थांबवली नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आर. एम. चौगुले यांनी दिला.

यावेळी विनय कदम, अरुण, मारुती चौगुले, यल्लाप्पा करटकर, संदीप डोणकरी, रवी चौगुले यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

आंतरराष्ट्रीय ख्यातीची जंबो सर्कस 25 आॕक्टो.पर्यंत सीपीएड मैदानावर

Spread the love  बेळगांव : जगप्रसिद्ध जंबो सर्कस बेळगाव शहरात दाखल झाली असून, आंतरराष्ट्रीय कलाकारांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *