Friday , October 23 2026
Breaking News

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून शेतकऱ्यांचे आंदोलन

Spread the love

 

हिरेबागेवाडी टोलनाक्यावर शेकडो शेतकरी एकवटले; हुबळीपर्यंत पदयात्रा काढण्याचा निर्णय

बेळगाव : विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. केंद्र आणि राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांनी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

बेळगाव जिल्ह्यातील हिरेबागेवाडी टोलनाक्याजवळ शेकडो शेतकरी एकत्र आले होते. सरकारकडून आपल्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करत त्यांनी प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून संताप व्यक्त केला. या आंदोलनामुळे परिसरात शेतकऱ्यांच्या आंदोलनाची तीव्रता पुन्हा एकदा दिसून आली.

गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू असूनही मागण्यांवर ठोस निर्णय होत नसल्याने शेतकऱ्यांनी आंदोलनाची दिशा बदलण्याचा निर्णय घेतला आहे. हिरेबागेवाडी येथून पदयात्रेने हुबळीच्या दिशेने कूच करून सरकारपर्यंत आपला आवाज पोहोचवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

शेतकऱ्यांच्या मागण्यांवर तातडीने निर्णय घेऊन आंदोलनाची दखल घ्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

About Belgaum Varta

Check Also

आंतरराष्ट्रीय ख्यातीची जंबो सर्कस 25 आॕक्टो.पर्यंत सीपीएड मैदानावर

Spread the love  बेळगांव : जगप्रसिद्ध जंबो सर्कस बेळगाव शहरात दाखल झाली असून, आंतरराष्ट्रीय कलाकारांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *