बेळगाव : बेळगाव येथील मराठा मंडळ कला, वाणिज्य, विज्ञान आणि गृहविज्ञान महाविद्यालयात शिकणाऱ्या बी.कॉम. प्रथम वर्षाची सहाना एस. सार. आणि बी.ए. प्रथम वर्षाची भूमिका व्ही.एन. विद्यार्थिना ज्यूडोमध्ये विशिष्ट कामगिरी केल्याबद्दल राणी चन्नम्मा विद्यापीठाचा ‘युनिव्हर्सिटी ब्लू’ हा मानाचा किताब बहाल करण्यात आला आहे.
सहाना एस. सार. हिने शिमोगा येथे आयोजित राज्यस्तरीय ज्यूडो स्पर्धेमध्ये 63 किलो गटात सुवर्ण पदक, ज्यूडो फेडरेशन आँफ इंडिया तर्फे आयोजित खेलो इंडिया राष्ट्रीय ज्यूडो लिग स्पर्धेत 63 किलो गटात सूर्वण पदक, केरळमध्ये झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील दक्षिण वलय स्पर्धेच्या 63 किलो गटात सुवर्ण आणि कांस्य पदक तसेच राणी चन्नमा विद्यापीठाच्या लिंगराज महाविद्यालयात आयोजित अंतर-महाविद्यालयीन 63 किलो ज्यूडो गटात प्रथम क्रमांक पटकाविले आहे.
भूमिका व्ही.एन. यांनी न्यू दिल्ली मध्ये आयोजित 78 किलो गटात राष्ट्रीय स्तरावरील ज्यूडो चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक, शिमोगा येथे आयोजित राज्यस्तरीय 78 किलो गटात सुवर्ण पदक, बेंगलोर येथे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील ज्यूडो चॅम्पियन 78 किलो गटात सुवर्ण पदक, मैसूर दसरा मध्ये आयोजित राज्यस्तरीय 78 किलो गटात सुवर्ण पदक, केरळ येथे आयोजित खेलो इंडिया ज्यूडो राष्ट्रीय लीग 78 किलो गटात कांस्य पदक तसेच लिंगराज महाविद्यालयात राणी चन्नमा विद्यापीठातर्फे आयोजित अंतर-महाविद्यालय 78 किलो गटात प्रथम क्रमांक पटकाविले आहे.
सहाना एस. आर. आणि भूमिका व्ही. एन. यांच्या या विशेष कामगिरी बद्दल मराठा मंडळ च्या अध्यक्षा राजश्री नागराजु यांनी विशेष अभिनंदन आणि कौतुक केले. मराठा मंडळ पदवी महाविद्यालयाचे प्राचार्य जी.वाय. बेन्नाळकर आणि शारीरिक निर्देशक प्रा. राजू हट्टी यांचे या दोघांना विशेष मार्गदर्शन लाभले.