बेळगाव : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी रविवार दि. 1 जानेवारी रोजी रात्री बैलहोंगल तालुक्यात एकाचा खून झाल्याची घटना घडली.
बैलहोंगल येथून जवळच असलेल्या अनिगोळ येथे एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. मंजुनाथ सुंगर (45) याची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात 25 अजय हिरेमठ हा संशयित आरोपी आहे.
मंजुनाथ आणि अजयचे दारूच्या नशेत भांडण झाले. त्यामुळे झालेल्या वादावादीत दगडाने मारले. यात मंजुनाथ गंभीर जखमी होऊन मरण पावला. घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली असता दगडाने ठेचून खून झाला असावा असे दृश्य आढळून आले. या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.