नंदगड : येथील एनआरई संस्था संचलित महात्मा गांधी संयुक्त पदवीपूर्व महाविद्यालयात नुकताच वार्षिक क्रीडा स्पर्धा व स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले.
2022-23 सालाच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा विद्यालयाच्या मैदानावर पार पडल्या. दोन दिवस या क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात होते. संस्थेचे चेअरमन श्री. सी. जी. वाली यांच्या अध्यक्षतेखाली पार पडल्या.
प्रारंभी संस्थेचे संस्थापक व थोर स्वातंत्र्य सैनिक लोकनेते कै. बसप्पांना अरगांवी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला नंदगड पोलीस स्टेशनचे सीपीआय श्री. एस. बी. माळगोंड यांच्या हस्ते पुष्पहार घालून त्यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करण्यात आले.
विद्यालयाचे शारीरिक शिक्षक श्री. बी. आर. कोडसोमण्णावर व श्री. प्रवीण हितलकेरी यांनी विद्यार्थ्यांच्या सोबत पथसंचलन केले. स्पर्धेची उद्घाटन सीपीआय श्री. एस. बी. मालगोंड यांच्या हस्ते झाले.
मैदानावरती हायस्कूल विभाग व कॉलेज विभागातील विद्यार्थ्यांनी क्रीडा स्पर्धेच्या विविध विभागात भाग घेऊन अनेक पारितोषिके मिळविली. वैयक्तिक व सांघिक खेळ घेण्यात आले. या क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला अनेक मान्यवर अतिथी उपस्थित होते. यामध्ये श्रीमती एस. एल. मिरजे शारीरिक शिक्षण विभाग गट शिक्षणाधिकारी कार्यालय खानापूर, संस्थेचे उपाध्यक्ष श्री. एम. बी. राऊत, कार्यदर्शी श्री. विजय अण्णा आरगावी, संचालक श्री. महांतेश वाली, पदवी कॉलेजचे प्राचार्य जे. एस. जोडग्गी, बसप्पांना आरगावी, इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती नेहा दलाल आदी उपस्थित होते.
दुसर्या दिवशी संपन्न झालेल्या पारितोषिक वितरण व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी झालेल्या कार्यक्रमा वेळी श्री. जी. वाली अध्यक्षस्थानी होते तर संचालक श्री. पी. के. पाटील, संस्थेचे खजिनदार हाजी एम. एम. काजी, उपाध्यक्ष श्री. देवेंद्र पाटील, कार्यदर्शी श्री. विजयअण्णा आरगावी व सेवानिवृत्त शारीरिक शिक्षक श्री. एस. के. घारशी इत्यादी उपस्थित होते.
कॉलेजचे प्राचार्य एम. के. बजंत्री यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. अध्यक्षस्थानावरून बोलताना श्री. सी. जी. वाली म्हणाले, कोरोनामुळे दोन वर्ष या क्रीडा स्पर्धा थांबल्या होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचे खेळाकडे दुर्लक्ष झाले होते. सुदृढ आरोग्यदायी जीवन जगायचे असेल तर विद्यार्थ्यांनी खेळाकडे पूर्णपणे लक्ष दिले पाहिजे. क्रीडेच्या किंवा आपल्या आवडीच्या एखाद्या खेळाच्या माध्यमातून तुम्ही जीवन घडवू शकता याची उदाहरणे आपल्याला देश विदेशात नावलौकिक मिळवलेल्या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळतात. उत्तम आरोग्य हीच खरी संपत्ती आहे, असे ते म्हणाले. यावेळी क्रीडा स्पर्धेत यश मिळवलेल्या मुला-मुलींना पारितोषिके देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये हायस्कूल व कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी अनेक गाण्यांवर नृत्य सादर करून आपल्या संस्कृतीचे दर्शन घडविले.
यावेळी बहुसंख्य पालक व गावांतील नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावून कार्यक्रमाचा आनंद लुटला. कार्यक्रमाची सूत्रसंचालन श्री. एम. एम. पवार, डॉ. एस. डी. कटगी व श्री. एम. आय. बदामी यांनी केले. तर उपप्राचार्य श्रीमती वाय. व्ही. पाटील यांनी आभार मानले.