खानापूर : येथील मराठा मंडळ महाविद्यालयाच्या जिमखाना विभागाचे उद्घाटन कार्यक्रम नुकताच पार पडला. सदर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून श्री. नागराजू यादव तसेच प्रमुख पाहूने म्हणून श्री. शिवाजी पाटील व श्री. परशुराम अण्णा गुरव उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयाच्या बीए प्रथम सत्रात शिकणाऱ्या कु. मल्लाप्पा करगुप्पी या मुष्ठीयुध्द खेळात विविध स्थरावर आपले कौशल्य दाखवून विजय मिळविलेल्या विद्याथ्याचा सत्कार करण्यात आला. त्याने पाँडेचेरी येथे आयोजित दक्षिण भारतीय पुरुष बॉक्सींग चँम्पियनशिपमध्ये पदक, म्हैसूर येथे आयोजित चँम्पियनशिपमध्ये काँस्य पदक, बेंगळूर एचएमटि स्पोर्टस क्लब आयोजित कर्नाटक बॉक्सींग चँम्पियनशिपमध्ये 48 वजन किलोगटात सुवर्ण पदक तसेच बेंगळूर येथील विद्यानगर क्रिडा वसतीगृह आयोजित दुसर्या वरिष्ठ बॉक्सींग चँम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदके मिळवून महिविद्यालयाचे नाव उंचावले आहे. त्याच्या या यशाबद्दल महाविद्यालयाच्या सर्वेसर्वा राजश्री हलगेकर, प्राचार्या बागेवाडी, प्रा. कपिल गुरव तसेच इतर प्राध्यापक वर्गाकडून त्याचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.