बेळगाव : केवळ राजकारणा पुरता छ्त्रपती शिवाजी महाराजांचा वापर करणाऱ्या राष्ट्रीय पक्षातील नेते मंडळींना चोख प्रत्त्युत्तर देण्यासाठी याची सुरुवात किल्ले राजहंसगडावरून होणार आहे, असे मत समिती नेते रमाकांत कोंडूस्कर यांनी व्यक्त केले.
माजी महापौर आणि मध्यवर्ती सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांनी किल्ले राजहंसगड ते बेळगाव रेल्वे स्थानकापर्यंत काढण्यात येणाऱ्या “शिवसन्मान” पद यात्रेला पाठिंबा देत शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. मंगळवारी समिती नेते रमाकांत कोंडूस्कर यांच्यासह युवक कार्यकर्त्यांनी अष्टेकर यांची भेट घेत “शिवसन्मान” यात्रेच्या आयोजनाचा उद्देश्य स्पष्ट केला.
बेळगाव रेल्वे स्थानकाला छ्त्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यास भाग पाडण्यासाठी “शिवसन्मान” यात्रेचे आयोजन होणार असून पद यात्रेत मराठी अस्मिता मुंबई धरणे आंदोलन मोर्चाची जनजागृती देखील होईल, असे कोंडूस्कर म्हणाले.
यावेळी सुहास चौगुले, मध्यवर्ती पीआरओ विकास कलघटगी, माजी एपीएमसी सदस्य महेश जुवेकर आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta