बेळगाव : अखेर भाजपची यादी जाहीर झाली असून बेळगावातून जगदीश शेट्टर आणि उत्तर कन्नडमधून विश्वेश्वर हेगडे कागेरी यांची उमेदवारी अंतिम झाली आहे.
उत्तर कन्नड मधून भाजपने विद्यमान खासदार अनंतकुमार हेगडे यांना डावलले असून विश्वेश्वर हेगडे कागेरी यांना उमेदवारी दिली आहे. अखेर बेळगाव लोकसभा मतदारसंघातून जगदीश शेट्टर यांचे नाव अंतिम झाले आहे.