बेळगाव : सुळगा (हिं.) ता. बेळगाव येथे शनिवार दि. १८ मे रोजी सिलेंडरचा स्फोट होऊन वृद्ध दाम्पत्य गंभीर जखमी झाले होते. मात्र शुक्रवार दि. २४ मे रोजी सायंकाळी खाजगी इस्पितळात दाम्पत्याचा मृत्यू झाला.
शंकर गल्ली, सुळगा येथील रहिवासी कल्लाप्पा यल्लाप्पा पाटील (वय ६५) आणि त्यांच्या पत्नी सुमन कल्लाप्पा पाटील (वय ६१) हे दोघेही शनिवार दिनांक १८ मे रोजी घरामध्ये सिलेंडर गॅस गळतीमुळे आगीचा भडका उडून गंभीर जखमी झाले होते. त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. पुढील उपचारासाठी खाजगी इस्पितळात हलवले होते. मात्र उपचार सुरू असताना सहा दिवसानंतर मृत्यू ओढवला आहे.
या दाम्पत्यावर शनिवार दि. २५ मे रोजी सकाळी ११.३० वा. सुळगा (हिं.) स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सून, मुलगी, जावई असा परिवार आहे.
Check Also
ईद-ए-मिलाद २२ सप्टेंबर रोजी साजरा करणार; मुस्लिम बांधवांचा निर्णय
Spread the love बेळगाव : गणेशोत्सव काळातच होणार असलेला ईद-ए-मिलाद हा सण पुढे ढकलण्याचा निर्णय …