बेळगाव : हुतात्म्यांनी दिलेल्या बलिदानाचे स्मरण करून पुन्हा नव्याने लढा उभा करण्याचा निर्धार महाराष्ट्र एकीकरण समितीने कन्नडसक्ती विरोधी आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन करताना केला.
हिंडलगा येथील स्मारकात शनिवारी सकाळी कन्नड सक्ती विरोधी आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले.
१ जून १९८६ साली सीमाभागात कन्नड सक्ती लागू करण्यात आली त्यावेळी मोठ्या प्रमाणात जनक्षोभ उसळला. या आंदोलनात सीमाभागातील ९ जणांना हौतात्म्य पत्करावे लागले. मराठी बहुल भाग अन्यायकारकरित्या कर्नाटकात डांबण्यात आला आहे. दिवसेंदिवस कर्नाटक सरकार कन्नड सक्ती तीव्र करण्यास आग्रही दिसत आहे. अशावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीला नव्या दमाने उभारी घ्यावी लागणार आहे त्यामुळे न्यायालयीन लढ्यासोबत रस्त्यावरची लढाई देखील अशीच सुरू राहील असा निर्धार यावेळी करण्यात आला.
यावेळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, मालोजीराव अष्टेकर, आर. एम. चौगुले, महादेव पाटील, रमाकांत कोंडुस्कर, गोपाळराव देसाई, माजी आमदार दिगंबर पाटील, निरंजन सरदेसाई, सतीश पाटील, रेणू किल्लेकर, मांडेकर आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.
हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र वाहण्यात आल्यानंतर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, उपाध्यक्ष ऍड. राजाभाऊ पाटील, सरचिटणीस माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, शहर समितीचे कार्याध्यक्ष रणजीत चव्हाण पाटील, खजिनदार प्रकाश मरगाळे, समिती नेते रमाकांत कोंडुस्कर, आर. एम. चौगुले, खानापूरचे माजी आमदार दिगंबर पाटील, ऍड. अमर येळ्ळूरकर, निरंजन सरदेसाई, मारुती परमेकर, मदन बामणे, लक्ष्मण होनगेकर, मनोज पावशे, मनोहर संताजी, खानापूर तालुका म. ए. समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई, सरचिटणीस आबासाहेब दळवी, रामचंद्र मोदगेकर, मुरलीधर पाटील, गोपाळ पाटील, आर. आय. पाटील, मदन बामणे, चंद्रकांत कोंडुस्कर, माजी महापौर शिवाजी सुंठकर, शुभम शेळके, अंकुश केसरकर, नितीन देसाई, ऍड. सुधीर चव्हाण, पांडुरंग पट्टण, शिवाजी राक्षे, सुनील अष्टेकर, यल्लाप्पा पाटील, प्रकाश अष्टेकर, दुधाप्पा बागेवाडी, सतीश पाटील, महेश जुवेकर, अनिल पाटील, अमित देसाई, धनंजय पाटील, उमेश पाटील, शेखर पाटील, श्रीकांत कदम, माजी जि. पं. सदस्या सरस्वती पाटील, माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, सुधा भातकांडे, शिवानी पाटील, साधना पाटील, रूपा नावगेकर आदींनी हुतात्मा स्मारकाला पुष्पहार व फुले वाहून अभिवादन केले. यावेळी उपस्थित सर्वांनी दोन मिनिटे मौन बाळगून कन्नड सक्ती आंदोलनातील हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली.