Wednesday , August 26 2026
Breaking News

कामगारांच्या कष्टातूनच समाजाची प्रगती : मदन बामणे

Spread the love

 

संजीवीनी फौंडेशनमध्ये कामगार दिन उत्साहात साजरा

बेळगाव : संजीवीनी फौंडेशनमध्ये आंतरराष्ट्रीय कामगार दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
यावेळी गेल्या सहा वर्षांपासून संस्थेमध्ये स्वयंपाकाची जबाबदारी (अन्नपूर्णा) सांभाळत प्रामाणिक सेवा देणाऱ्या जमुना कडोलकर यांचा मदन बामणे यांच्या हस्ते शाल, गुलाबपुष्प व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमात संस्थेचे चेअरमन मदन बामणे यांनी कामगार दिनाचे महत्त्व सांगताना जगभरातील सर्व कष्टकरी आणि कामगारांचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. कोणताही देश किंवा समाज केवळ बोलण्याने मोठा होत नाही तर तो कामगारांच्या घामातून आणि मेहनतीतून उभा राहतो. घराची भिंत बांधणाऱ्या गवंड्यापासून, शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यापर्यंत, स्वच्छता राखणाऱ्या सफाई कामगारांपासून ते मोठमोठ्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपर्यंत प्रत्येकाचा देशाच्या प्रगतीत मोलाचा वाटा आहे, असे प्रतिपादन केले.
तसेच, कामगार हा समाजाचा कणा आहे. म्हणूनच केवळ एका दिवसापुरता नव्हे, तर वर्षभर त्यांच्या कष्टांचा सन्मान राखला पाहिजे. तुम्ही रात्रंदिवस प्रामाणिकपणे काम करत आहात म्हणूनच आम्ही गरजू रुग्णांची सेवा करू शकत आहोत. तुमचे मनःपूर्वक आभार आणि सर्वांना कामगार दिनाच्या शुभेच्छा असेही त्यांनी सांगितले.

यानंतर प्रशासक पद्मा औषेकर, एचआर कावेरी लमाणी, समुपदेशक सरिता सिद्दी आणि सुनिल चन्नदासर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी सावित्री माळी यांनी आभार मानले तर सूत्रसंचालन अक्षता अक्कोळे यांनी केले

About Belgaum Varta

Check Also

तुरमुरीत मटक्याचा डाव उधळला; बुकिला बेड्या

Spread the love  तलावानजीक मटका नंबर घेण्याचा उद्योग; ग्रामीण पोलिसांचा छापा, रोकड व चिठ्ठ्या जप्त …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *