Sunday , June 21 2026
Breaking News

प्रगतिशील लेखक संघातर्फे महाराष्ट्र दिन-कामगार दिन साजरा

Spread the love

 

बेळगांव : कामाचे तास आठ असावेत या मागणीसाठी अमेरिकेतील शिकागो येथे १८८६ मध्ये आंदोलन झाले. पण त्याआधी १८८४ मध्ये महात्मा फुले यांच्या प्रेरणेने नारायण मेघाजी लोखंडे यांनी कामगारांची संघटना स्थापन करुन त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आंदोलन केले, असे उद्गार प्रा. आनंद मेणसे यांनी काढले.
राज्य मराठी विकास संस्था मुंबईच्या प्रेरणेने येथील प्रगतिशील लेखक संघाच्या वतीने शुक्रवारी (१ मे) रोजी कामगार दिन व महाराष्ट्र दिन असा संयुक्त कार्यक्रम साजरा झाला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कामगार नेते ऍड. नागेश सातेरी होते. प्रमुख पाहुणे म्हणून मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे उपस्थित होते.

शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे माजी अध्यक्ष टी. के. पाटील यांच्या निधनाबद्दल प्रारंभी शोक व्यक्त करुन त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

यानंतर प्रगतिशील लेखक संघाचे कार्यवाह कृष्णा शहापूरकर यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. यावेळी बोलताना त्यांनी प्रगतिशील लेखक संघाच्या कार्याचा आढावा घेतला. तसेच कामगार दिन व महाराष्ट्र दिनाचे महत्त्व विशद केले.
यानंतर अध्यक्षांच्या हस्ते पाहुणे प्रकाश मरगाळे यांचा शाल व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. तसेच अध्यक्ष सातेरी व वक्ते मेणसे यांना कृष्णा शहापूरकर यांच्या हस्ते पुस्तक भेट देऊन गौरविण्यात आले.

प्रा. आनंद मेणसे यांनी आपल्या भाषणात यंत्र युगाचा प्रारंभ, उद्योजक व कामगार वर्गाचा उदय, उद्योजकांकडून कामगारांचे होणारे शोषण व त्याविरोधात कामगारांनी लढे आणि मिळविलेले हक्क याचे सविस्तर विवेचन केले.

प्रकाश मरगाळे यांचेही यावेळी समयोचित भाषण झाले. सातेरी यांच्या अध्यक्षीय समारोपानंतर संघाचे सहकार्यवाह प्रा. अशोक अलगोंडी यांनी आभार मानले. उपाध्यक्ष अनिल आजगावकर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील कार्यकर्ते व बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

22 जूनच्या कन्नडसक्ती मोर्चाला कर्नाटक प्रशासनाचा नकार; कायदा-सुव्यवस्थेचे दिले कारण

Spread the love  बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आयोजित 22 जून रोजीच्या कन्नडसक्ती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *