Wednesday , August 26 2026
Breaking News

जायंट्स सखीतर्फे कामगार दिनी महिला कामगारांचा सन्मान

Spread the love

 

बेळगाव : दगडावर कोरीव काम करणाऱ्या कष्टकरी महिलांचा सन्मान जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव सखी या संघटनेच्या वतीने दि. १ मे रोजी करण्यात आला. किल्ला तलावाजवळ रोज दगडावर कोरीव काम करून कठोर परिश्रमातून आपले जीवन उभारणाऱ्या या कामगारांच्या कार्याची दखल घेत त्यांना प्रोत्साहन देण्यात आले. यावेळी सोनाबाई पाथरोडे, शालन साळुंखे, राधा शिंदे, सरोजा महादेव साळुंखे, गीता वसंत माळी, रेखा मारुती इंगळे, सुगंधा शंकर पाथरोडे, रमिला बटवाला, पुतळाबाई साळुंखे, राधा पाथरोडे यांचा सत्कार करून सर्व मेहनती कामगारांच्या जिद्दीला व संघर्षमय जीवनाला सलाम करण्यात आला. त्यांच्या कार्यामुळे समाजाच्या विकासात मोठा हातभार लागतो, याची जाणीव यावेळी सर्वांना करून देण्यात आली.
हा कार्यक्रम अध्यक्षा सौ. सुलक्षणा शिनोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यावेळी फेडरेशन ऑफिसर अपर्णा पाटील, राजश्री हसबे, दीपा पाटील, संजना पाटील, अर्चना कंग्राळकर, शीतल नेसरीकर आणि वर्दा अंगडी या सदस्य उपस्थित होत्या.

About Belgaum Varta

Check Also

तुरमुरीत मटक्याचा डाव उधळला; बुकिला बेड्या

Spread the love  तलावानजीक मटका नंबर घेण्याचा उद्योग; ग्रामीण पोलिसांचा छापा, रोकड व चिठ्ठ्या जप्त …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *