Sunday , June 21 2026
Breaking News

कर्लेचे नायब सुभेदार उज्जैन जवळील अपघातात मृत्युमुखी

Spread the love

 

बेळगाव : समोरून निघालेल्या भरधाव कंटेनर चालकाने अचानक ब्रेक लावल्याने मागून येणाऱ्या कार चालकाने कंटेनरला धडक दिली. या अपघातात कर्ले गावचे नायब सुभेदार मृत्युमुखी पडले, तर त्यांचे सासरे जखमी आहेत.

शुक्रवारी मध्य प्रदेशात हा अपघात घडला. रामचंद्र मोहन पाटील (वय ३२, रा. ब्रह्मलिंग गल्ली, कर्ले, ता. बेळगाव) असे मृत नायब सुभेदाराचे नाव आहे. त्यांचे मावस सासरे गोविंद पाटील (वय ४९) हे किरकोळ जखमी झाले. शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास मध्य प्रदेशातील उज्जैन येथील गोरठ महामार्गावरील पदमाखोरिया गावाजवळ हा अपघात घडला.

About Belgaum Varta

Check Also

22 जूनच्या कन्नडसक्ती मोर्चाला कर्नाटक प्रशासनाचा नकार; कायदा-सुव्यवस्थेचे दिले कारण

Spread the love  बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आयोजित 22 जून रोजीच्या कन्नडसक्ती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *