Sunday , June 21 2026
Breaking News

कपिलेश्वर मंदिरामागील विहिरीत दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू

Spread the love

 

बेळगाव : दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपिलेश्वर मंदिराच्या मागील विहिरीत रविवारी सकाळी घडलेल्या दुर्दैवी घटनेत दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विहिरीच्या कठड्याची भिंत अचानक कोसळून पोहत असलेल्या मुलांच्या अंगावर पडली. त्यामुळे दोन्ही मुले पाण्यात अडकून बुडाल्याची माहिती समोर आली आहे.

मृत मुलांची ओळख शिवम परशुराम सुंडीकर (वय ७) आणि परशुराम राजू निलजकर (वय ११) अशी झाली असून दोघेही शिवाजीनगर व शहापूर येथील जेड गल्ली परिसरातील रहिवासी होते. सुट्टीचा दिवस असल्याने दोघे पोहण्यासाठी विहिरीत गेले होते. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली असून त्यांचा आक्रोश पाहून वातावरण भारावून गेले.

घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल आणि एसडीआरएफ पथकाने घटनास्थळी धाव घेत शोध व बचावकार्य सुरू केले. अथक प्रयत्नांनंतर एका मुलाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून दुसऱ्या मुलाचा शोध सुरू आहे. महापालिका अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून विहिरीतील पाण्यात कॅमेरे टाकून तपास केला जात आहे. तसेच पाणी उपसण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे. या घटनेची नोंद खडेबाजार पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

About Belgaum Varta

Check Also

22 जूनच्या कन्नडसक्ती मोर्चाला कर्नाटक प्रशासनाचा नकार; कायदा-सुव्यवस्थेचे दिले कारण

Spread the love  बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आयोजित 22 जून रोजीच्या कन्नडसक्ती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *