Sunday , June 21 2026
Breaking News

जायंट्स मेनतर्फे आदर्शनगरमध्ये सफाई कामगारांचा सन्मान

Spread the love

 

बेळगाव : “स्वतःच्या आरोग्याची पर्वा न करता जनतेचे आरोग्य उत्तम राहिले पाहिजे यासाठी रोज भल्या पहाटे पासून कार्यरत राहणाऱ्या महापालिकेच्या काही कर्मचाऱ्यांचा सन्मान करून जायंट्स ग्रुप ऑफ बेलगाम मेन ने चांगले कार्य केले आहे” असे विचार माजी महापौर मंगेश पवार यांनी बोलताना व्यक्त केले. जायंट्स ग्रुप आणि आदर्श नगर येथील महालक्ष्मी कॉलनी गार्डन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी सकाळी महानगरपालिकेच्या आठ स्वच्छता कर्मीनचा सत्कार मंगेश पवार यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी रघु लाखे, गणेश दोडमणी, पवन, रमेश, सुजल, श्रीमती मंगल आणि विशाल या स्वच्छता कर्मचाऱ्यांबरोबरच त्यांचे सुपरवायझर अनंत पाटील यांनाही भेटवस्तू, मिठाई प्रमाणपत्र आणि गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.
जायंट्स चे अध्यक्ष लक्ष्मण शिंदे यांनी प्रास्ताविक करून जायंट्स ग्रुप करीत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. युनिट डायरेक्टर आणि सोसायटीचे अध्यक्ष संजय पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले. याप्रसंगी सर्वश्री मंगेश पवार, लक्ष्मण शिंदे, एन एल पाटील, प्राचार्य चंद्रकांत कदम, एम एल लमाणी, सीए उमेश बोळमळ व पी टी हळदणकर यांनी सत्कार समारंभात भाग घेतला. याप्रसंगी सर्व श्री अनंत लाड, आनंद कुलकर्णी, नागेश संभाजी, किरण सन्माने, मधु चौधरी, व्यंकटेश कुलकर्णी, चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपाध्यक्ष गंगाधर कल्याणी यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

सीमाभागातल्या मराठी भाषिकांच्या मूलभूत अधिकारांच्या उल्लंघना विरुद्ध दाखल करणार रिट याचिका

Spread the love  बेळगाव : सीमा भागात होणाऱ्या मूलभूत अधिकारांच्या उल्लंघना बद्दल सर्वोच्च न्यायालयाचे वकील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *