Saturday , March 22 2025
Breaking News

सायबर गुन्हेगारांनी आता गर्भवती महिलांना लक्ष्य!

Spread the love

 

बेळगाव : डिजिटल अरेस्टच्या प्रकारानंतर सायबर गुन्हेगारांनी आता गर्भवती महिलांना आपले लक्ष्य बनविले आहे. पोषण अभियान अंतर्गत नावे नोंदणी केलेल्या गर्भवती महिलांच्या बँक खात्यातील रक्कम गायब करण्याचा सपाटाच गुन्हेगारांनी सुरू केला असून त्यामुळे एकच खळबळ माजली आहे.

गेल्या आठवड्याभरात बेळगाव शहर व उपनगरात आठहून अधिक गर्भवती महिलांच्या बँक खात्यातून रक्कम लाटण्यात आली आहे. फसवणुकीच्या या नव्या प्रकाराने तपास यंत्रणांचीही डोकेदुखी वाढली असून पोषण अभियानांतर्गत सरकारी मदत मिळेल, या आशेने बसलेल्या गर्भवती महिलांची लुबाडणूक केली जात आहे. आठहून अधिक महिला तक्रार देण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी शहर सीईएन पोलीस स्थानकात पोहोचल्या होत्या. पोषण अभियान योजनेच्या लाभार्थी महिलांना कॉल येतो. तुमच्या बँक खात्यात ७ हजार ५०० रुपये जमा होणार आहेत. त्याआधी तुमच्या व्हॉट्सअपवर एक लिंक पाठवली जाईल, त्यावर क्लिक करा आणि ओटीपी कळवा, लगेच तुमच्या खात्यात रक्कम जमा होईल, असे सांगितले जात आहे. त्यांनी पाठवलेल्या लिंकवर क्लिक करून ओटीपी पाठवताच बँक खात्यातील रक्कम गायब केली जात असून आतापर्यंत ८२.८२ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची माहिती शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन यांनी दिली आहे.

About Belgaum Varta

Check Also

रोजच्या चुकीच्या लाइफस्टाईलमुळे वाढतोय ब्रेस्ट कॅन्सरचा धोका : डॉ. सविता कद्दु

Spread the love  संजीवीनी फौंडेशन आयोजित व्याख्यान प्रसंगी केले महिलांना मार्गदर्शन हिंडलगा : सध्या महिलांमध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *