बेळगाव : बेळगाव तहसीलदार कार्यालयात उपविभागीय कारकूनाची तहसीलदार कार्यालयात चक्क तहसीलदार कक्षातच आत्महत्या केल्याने तहसीलदार कार्यालयासह बेळगाव शहरात एकच खळबळ मजली आहे
तहसीलदार कार्यालयात उपविभागीय कारकून म्हणून कार्यरत असलेले रुद्रेश येडवणावर यांनी तहसीलदार कक्षातच गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेमागचे कारण अद्याप स्पष्ट आहे घटनेची माहिती मिळताच खडे बाजार पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. सदर घटनेमुळे बेळगाव तहसीलदार मात्र कचाट्यात सापडले आहेत.