Wednesday , December 6 2023
Breaking News

बिजगर्णी श्री ब्रह्मलिंग कुस्तीगीर संघटनेची बैठक संपन्न

Spread the love

बेळगाव : बिजगर्णी येथील श्री ब्रह्मलिंग कुस्तीगीर संघटनेची बैठक गावातील ब्रम्हलिंग मंदिरात वसंत अष्टेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली
प्रारंभी यावर्षीच्या सुरुवातीला दिवंगत झालेले अनाथांची माय सिंधुताई सपकाळ, सीमा चळवळीचे आधारवड माजी मंत्री एन. डी. पाटील, अनिल अवचट, अभिनेते रमेश देव, गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी वाय. पी. नाईक यांनी मागील सभेचा आढावा घेऊन पुढील उपक्रम कोणकोणते राबविणे गरजेचे आहे, याची माहिती दिली.
तसेच कुस्तीगीर संघटनेचे कार्याध्यक्ष मनोहर बेळगावकर यांची बिजगर्णी ग्राम पंचायत अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव करण्यात आला.
यावेळी के. आर. भाष्कळ, प्रा. आनंद आपटेकर, सुनील जाधव, प्रकाश भाष्कळ यांनी विचार व्यक्त करून कुस्ती आखाडा भरविणे संबंधीची चर्चा केली.
कुस्तीची परंपरा टिकविण्यासाठी स्थानिक पैलवानांना प्रोत्साहन देणे, कुस्तीची आवड निर्माण करण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांसाठी मॅटवरील कुस्ती स्पर्धा आयोजित करुन, कुस्ती खेळाची आवड निर्माण व्हावी यासाठी संघटनेनं प्रयत्न करावा आदि विषयांवर विचार विनिमय करण्यात आले.
या बैठकीला देवापा मोरे, मारुती क‌. जाधव, बाळू हलकरणीकर, मारुती अष्टेकर, बाळू निलजकर, रजनीकांत अष्टेकर, आदि कुस्ती प्रेमी उपस्थित होते
शेवटी मनोहर प. मोरे यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

सौंदत्ती डोंगरावर धार्मिक पर्यटन विकासाला संधी

Spread the love  मंत्री एच. के. पाटील यांची विधानसभेत माहिती बेळगाव : शासनाने राज्यातील महत्त्वाच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *