बेळगाव : जक्केरी होंड इंद्रप्रस्थनगर येथील श्री साई सृष्टी अपार्टमेंट फ्लॅट ओनर संघटनेच्या वतीने शुक्रवारी अपार्टमेंटच्या आवारात साई मंदिराचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
सकाळी ९ ते १३ या दरम्यान साईंच्या मूर्तीची प्रतिष्ठापना व पूजा अर्चा सत्यनारायण पूजा होम, अभिषेक होणार आहे. त्यानंतर दुपारी १ ते ४ या दरम्यान महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या शुक्रवार दि. ६ सायंकाळी ५ ते ८ मराठा मंदिर ते श्री साई सृष्टी अपार्टमेंटपर्यंत वाजत-गाजत मूर्तीचे आगमन सोहळा होणार आहे, तरी भाविकांनी शुक्रवारी होणाऱ्या महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे मंडळाने आवाहन केले आहे.