Sunday , July 26 2026
Breaking News

पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवणार नाही याची काळजी घ्या : सीईओ राहुल शिंदे

Spread the love

 

कागवाड : उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये यासाठी दक्षता घेण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

मंगळवारी (दि. 11) कागवाड तालुक्यातील मंगसुळी गावातील बहुग्राम पिण्याच्या पाण्याच्या प्लांटला भेट दिली असता ते बोलत होते. दर 15 दिवसांनी पाण्याचे टँकर स्वच्छ करावेत. या भागात उन्हाळ्यात पाणीटंचाई वाढते. गुरांसाठी पाण्याची कमतरता भासणार नाही याची काळजी घेण्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा पंचायत उपसचिव बसवराज आडवीमठ, कागवाड तालुका कार्यकारी अधिकारी वीरण्णा वाली, अथणी तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी शिवानंद कल्लापूर, ग्रामीण पेयजल स्वच्छता विभागाचे सहायक कार्यकारी अभियंता रवींद्र मुरगळी आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

अलतगा सरकारी मराठी शाळेत आषाढी एकादशीनिमित्त बालवारकऱ्यांची दिंडी उत्साहात

Spread the love  अलतगा : आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त अलतगा येथील सरकारी मराठी उच्च प्राथमिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *