बेळगाव : तारांगण, रोटरी क्लब व जननी ट्रस्टच्या वतीने मातृदिना निमित्त आदर्श माता सन्मान सोहळा आयोजित केला आहे. हा कार्यक्रम शनिवार दिनांक 17 मे 2025 रोजी दुपारी 3.30 वाजता सरस्वती वाचनालयाच्या डॉ.शकुंतला गिजरे सभागृहात संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाचे प्रायोजक रोटरीक्लब ऑफ बेळगाव इलाईट, जननी ट्रस्ट हे आहेत. ज्या मातांनी प्रतिकूल परिस्थितीशी सामना करून आपल्या पाल्यांना संस्कारक्षम, शिक्षित केले अशा आदर्श मातांचा सन्मान करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान डॉ. दत्तप्रसाद गिजरे भूषविणार आहेत. प्रमुख पाहुणे उद्योजिका पूजा बडदाळे, ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठानचे सचिव शिवाजीराव जळगेकर, रोटरी क्लबचे अध्यक्ष सचिन हंगिरकर, सचिव विशाल मुरकुंबी, श्रीराम इनोव्हेशनच्या संचालिका पूनम हंगीरकर उपस्थित राहणार आहेत. बेळगाव जिल्ह्यातील मातांच सन्मान होणार आहे.
हालशीच्या वात्सल्य सिंधू रुक्मिणी गुरव, प्रेमाचा सागर, आदर्श माता दुमनाबाई डिसोजा, संघर्षातून सामर्थ्य निर्माण करणारी माता शांता गुरव, यांनी या विषयावर लेखक संयमी व सहनशील माता द्रौपदी भागवाडकर स्वाभिमानी व स्वावलंबी माता सुरेखा सांगोळकर, परिवार व सामाजिक नाते सांभाळणारी माता मंगल खांडेकर, संस्कारीत चिरेबंदी घर अस्मिता आळतेकर, उत्साहाचा झरा राजश्री हावळ यांचा सन्मान केला जाणार आहे.