बेळगाव : वडगाव येथील सपार गल्ली आणि तेग्गीन गल्ली येथील ड्रेनेजचे काम थांबवल्याच्या महापालिकेच्या निर्णयाचा निषेध करत गुरुवारी सपार गल्ली आणि तेग्गीन गल्ली रहिवाशांनी निदर्शने करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. ज्यामध्ये
चौडेश्वर गल्लीच्या एका भागात महापालिकेने ड्रेनेजचे काम अपूर्ण ठेवले आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून नाल्यात कचरा साचत आहे, त्यामुळे दुर्गंधी येत आहे आणि ती अद्याप साफ केलेली नाही, अशी तक्रार त्यांनी केली.
चौडेश्वर गल्लीतील रस्ता आणि ड्रेनेजचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश पालिका अधिकाऱ्यांना द्यावेत. वडगाव येथील रहिवासी चौंडेश्वर गल्लीपासून धामणे रोडला लागून असलेल्या मल्लिकार्जुन येळ्ळूरच्या खुल्ला जमिनीत कचरा टाकत आहेत. या संदर्भात महापालिका मल्लिकार्जुन यांना नोटीस बजावली आणि ते स्वच्छ करण्याची मागणी केली.
जयश्री कांबळे, सांज कडकोळ, एच. एम. सराफ, प्रिया कांबळे, सरिता कांबळे, कल्लाप्पा गोळी आदी उपस्थित होते.