बेळगाव : ‘ऑपरेशन मदत’ ग्रुप आणि गुजराती नवरात्री उत्सव मंडळ यांच्यामार्फत कँटोनमेंट विभागातील दुकानदार, घरगुती महिला, पोलीस कर्मचारी, जीआटी इंजिनियरींग काॕलेजचे विद्यार्थी, मॉर्निंग वॉकर्स तसेच ग्रामिण भागातील कष्टकरी मजूर, शेतकरी, यांना दररोज भाजीपाल्यासाठी उपयोगी येणाऱ्या कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले.
याचप्रमाणे कॅन्टोन्मेंट बोर्डच्या स्वच्छता विभाग आणि उद्यान विभाग कामगारांमध्ये प्लास्टिक पिशव्या न वापरण्याबद्दल जागृती करण्यासाठी कापडी पिशव्यांचे वाटप केले गेले.
प्लॅस्टिकमुक्त पर्यावरणासाठी माननिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी निर्देशनानूसार भारत सरकार व कर्नाटक राज्य सरकारद्वारा प्लॅस्टिकमुक्त अभियान राबविण्यात येत आहे. यावेळी रमेशभाई लद्दड, विजय भद्रा, भाविन पटेल, राहुल पाटील, शिवप्रसाद सर, सौरभ बडवे, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे कर्मचारी व आॕपरेशन मदत ग्रूपचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.