अहमदाबाद : अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या लंडनला जाणाऱ्या विमान काही सेकंदातच मेघाणीनगर परिसरात कोसळले आणि भीषण स्फोट झाला. इतका भयानक होता की, विमानाचे लोखंडदेखील वितळले, आणि प्रवाशांचे अवयव छिन्नविछिन्न अवस्थेत आढळले. पण या सगळ्यात चमत्कारी गोष्ट समोर आली आहे. शोधकार्यादरम्यान, बचाव पथकाला पवित्र ग्रंथ भगवद्गीता सापडली आहे. विशेष म्हणजे, भगवद्गीता पूर्णपणे सुरक्षित असून, वाचनीय स्थितीत होती.
बचावपथकाला शोधकार्यदरम्यान भगवद्गीता सापडली. कदाचित कुणीतरी प्रवासी अहमदाबादहून लंडनला हा पवित्र ग्रंथ घेऊन जात असेल असा अंदाज लावण्यात येत आहे. याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एक व्यक्ती अपघातस्थळी असलेल्या ढिगाऱ्यांमधून भगवद्गीता काढत आहे. तसेच गीतेची पाने दाखवताना दिसत आहे. अपघातस्थळी सगळं काही जळून राख झालं आहे. पण भगवद्गीतेला काहीच झालेलं दिसत नाही आहे.
सध्या याचा व्हिडिओ सोशल माध्यमांमध्ये व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी चमत्कार असे कमेंट करून आश्चर्य व्यक्त केला आहे.