Monday , September 21 2026
Breaking News

वसतिगृहांची संख्या वाढवण्याच्या मागणीसाठी अभाविपचे आंदोलन

Spread the love

 

बेळगाव : एक वर्षापासून प्रलंबित असलेल्या शिष्यवृत्तीची त्वरित अंमलबजावणी करावी आणि वसतिगृहांची संख्या वाढवावी या मागणीसाठी बेळगावात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने निदर्शने करण्यात आली.
आज बेळगावातील राणी चन्नम्मा सर्कल येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदने हे आंदोलन केले. अभाविप, बेळगावचे सचिव सचिन हिरेमठ यांनी सांगितले की, राज्य सरकार दुजाभाव करत आहे. मागासवर्गीय कल्याण विभाग आणि समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहांमध्ये मूलभूत सुविधा पुरवल्या जात नाहीत. जेवणाचा खर्च केवळ १८७० रुपये दिला जात असल्याने विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार मिळत नाही. वसतिगृहांची संख्या वाढवणे आवश्यक आहे. त्याचबरोबर, गेल्या एक वर्षापासून प्रलंबित असलेली शिष्यवृत्ती तातडीने लागू करावी, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *