

येळ्ळूर : कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील सहकार क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करत असलेल्या नवहिंद को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या चेअरमनपदी शिवाजी सायनेकर, तर व्हाईस चेअरमनपदी अनिल हुंदरे यांची एकमताने निवड करण्यात आली. याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
सदर निवड अडीच वर्षांसाठी करण्यात आली आहे. याचबरोबर संचालक म्हणून श्री. प्रकाश अष्टेकर, श्री. संभाजी कणबरकर, श्री. वाय. सी. गोरल, श्री. एन. डी. गोरे, श्री. श्रीधर धामणेकर,श्री. नितिन कुगजी, श्रीमती स्नेहलता चौगुले, सौ. नीता जाधव, श्री. भिमराव रा. पुण्यांन्नावर कार्यरत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta